परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व आत्मशक्तीचेच आविष्कार असणे आणि जिवाच्या त्रिगुणानुसार मनात पालट होऊन त्याचा प्रभाव कार्यावर होणे

परात्पर गुरु पांडे महाराज

‘मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सर्व आत्मशक्तीचेच आविष्कार आहेत. ही आत्मशक्ती शुद्ध असते. त्या शक्तीला कार्यानुसार निरनिराळी नावे दिलेली आहेत. आत्म्यातील चैतन्यशक्ती जिवाच्या त्रिगुणाच्या माध्यमातून कार्य करते. हे कार्य म्हणजे ‘संकल्प-विकल्प’ होय. या शक्तीला ‘मन’ असे म्हणतात. या शक्तीद्वारे जिवाच्या त्रिगुणानुसार मनात पालट होऊन त्याचा प्रभाव कार्यावर होतांना दिसतो.

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज