‘हिंदु धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करून सभेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

‘सध्या बर्‍याच जिल्ह्यांत हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सभेतील अडथळे दूर होऊन ती निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी सनातनचे संत किंवा ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक नामजप करतात. सभेच्या आदल्या दिवशी आणि सभेच्या दिवशी त्यांनी करावयाचे नामजपादी आध्यात्मिक उपाय पुढे दिले आहेत.

१. नामजप : ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’

२. मुद्रा : तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे

३. प्रार्थना : ‘हे श्रीकृष्णा, … येथील सभेत येणारे सर्व अडथळे नष्ट होऊन सभा निर्विघ्नपणे पार पडू दे. सभेची अपेक्षित फलनिष्पती मिळू दे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक जणांचे संघटन होऊ दे’, अशी प्रार्थना आहे.’

सभेच्या सेवेत स्थानिक स्तरावर काही अडथळे येत असल्यास त्यांचाही प्रार्थनेत उल्लेख करावा. ही प्रार्थना सभेच्या आदल्या दिवशी आणि सभेच्या दिवशी प्रत्येक अर्ध्या ते एक घंट्याने करावी.

४. संत वा साधक यांनी किती घंटे नामजप करावा ?

जिल्हासेवकांनी वरीलप्रमाणे नामजप करण्यासाठी संत अथवा ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक यांचे पूर्वनियोजन करावे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०१८)