इंडोनेशिया येथील ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा इंडोनेशियाला अभ्यासदौरा

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करतांना गोपालन् यांच्या पत्नी श्रीकविता आणि त्यांच्या बाजूला श्री. विनायक शानभाग

जकार्ता (इंडोनेशिया) – हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् यांनी स्थापन केलेल्या ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेची मासिक बैठक १० मार्च या दिवशी जकार्ता येथील रेडस्टार या हॉटेलमध्ये झाली. या बैठकीमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी संघटनेच्या वतीने गोपालन् यांच्या पत्नी श्रीकविता यांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांना सन्मान केला, तर संघटनेचे मुख्य सचिव श्री. एरावंतो यांच्या हस्ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे पू. रेन्डी एकारांतियोया, विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी-साधक श्री. विनायक शानभाग, श्री. दिवाकर आगावणे, श्री. स्नेहल राऊत आणि श्री. सत्यकाम कणगलेकर उपस्थित होते. या बैठकीत इंडोनेशियातील ३४ पैकी १७ राज्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

पहिल्या ओळीत डावीकडून १. श्री. विनायक शानभाग २. श्री. गोपालन् ३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ४. श्रीकविता ५. पू. रेन्डी एकारांतियोया आणि अन्य

कार्यक्रमाच्या प्रारंभ बाली या द्वीपावरून आलेल्या एका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याने  केलेल्या ॐ आणि श्‍लोकाने, तसेच प्रार्थनेने झाली. त्यानंतर ‘सनातन धर्म गमा साधना’ संघटनेचे सचिव श्री. रोमो असेरू यांनी संघटनेच्या कार्याचा अहवाल सादर केला. या वेळी श्री. गोपालन् यांनी त्यांची पत्नी श्रीकविता आणि मुलगा गणेश यांची सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्याशी ओळख करून दिली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. विनायक शानभाग यांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळ आणि पू. रेन्डी एकारांतियो यांची उपस्थितांना ओळख करून दिली. संघटनेच्या कार्यकर्त्या सौ. केली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्री. गोपालन् यांचा परिचय

मूळ भारतीय असलेले हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् यांचे पूर्वज १५० वर्षांपूर्वी तमिळनाडूमधून इंडोनेशियामध्ये स्थायिक झाले. श्री. गोपालन् यांचा जन्म इंडोनेशियामध्ये झाला असून ते तेथील चौथ्या पिढीतील हिंदु आहेत. विश्‍वातील सर्वात मोठे द्वीपराष्ट्र  असलेल्या इंडोनेशियातील हिंदूंना एकत्रित करण्याचे मोठे कार्य श्री. गोपालन् यांनी केले.  त्यांनी वर्ष२०१३ मध्ये ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेच्या माध्यमातून इंडोनेशिया सरकारला हिंदूंसाठी ‘दीपावली’ची राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यास भाग पाडले. १७ सहस्र  द्वीप असलेल्या इंडोनेशियामध्ये एका प्रांतातून दुसर्‍या प्रांतात जाणेही अवघड आहे. अशा स्थितीत त्यांनी येथे विविध भाषा बोलणारे आणि विविध संप्रदाय असलेल्या हिंदूंना संघटित केले आहे.

क्षणचित्रे

१. श्री. गोपालन यांनी १७ द्वीपातून आलेल्या प्रतिनिधींपर्यंत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे कार्य पोहोचावे यासाठी साधकांना या कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यामुळे आम्हाला इंडोनेशियातील १७ द्वीपापर्यंत गुरुदेवांचे कार्य पोहोचवण्याची संधी मिळाली.

२. या वेळी १७ द्वीपातून आलेल्या प्रतिनिधींना एस्एस्आरएफ् आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व प्रतिनिधींना गोवा येथील आश्रमाला भेट देण्याविषयी आमंत्रित केले.

सार्‍या विश्‍वभर परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने कार्य कसे पसरत चालले आहे, त्याची आम्ही इंडोनेशियात प्रतिदिन अनुभूती घेत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती कमीच आहे. – सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी-साधक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now