काठमांडूत विमान कोसळून ५० जण ठार

काठमांडू – ढाक्याहून काठमांडूला जाणारे ‘यूएस्-बांगला एअरलाइन्स’चे विमान नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतांना कोसळले. या अपघातात अनुमाने ५० जण ठार झाले. १७ घायाळ प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंत्रालयाचे सहसचिव सुरेश आचार्य यांनी दिली. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.