कृपा करूनी सद्गुरु स्वातीताईंनी शिकवण दिली साधनेची ।

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु स्वातीताई असे आम्हा गुरुठायी ।

त्या असती आमुच्या ‘आध्यात्मिक आई’ ॥ १ ॥

संसाराच्या मायेतून सोडविले ।

अध्यात्माच्या वाटेवरी आणले ॥ २ ॥

दुःख अन् माया यांतून मुक्त केले ।

प्रीतीने तुमच्या चैतन्यमय कवेत घेतले ॥ ३ ॥

घडविण्या आम्हा किती तळमळ तुमची ।

तुमचेच हे सारे, नाही पात्रता आमची ॥ ४ ॥

आम्हावर कृपा करून शिकवण दिली साधनेची ।

या भवसागरातून मुक्त होऊन ‘देवाचे होण्याची’ ॥ ५ ॥

स्मरण होता आपले सद्गुरु स्वातीताई ।

क्षणार्धात डोळ्यांतून भावाश्रू येई ॥ ६ ॥

शरणागत अन् कृतज्ञता भावाने ।

मन आपल्या चरणी नतमस्तक होई ॥ ७ ॥

आपण आम्हाला गुरुमाऊलीच्या ठायी ।

शरणागत आम्ही आपल्या पायी ॥ ८ ॥

करवून उद्धार या जिवाचा न्यावे गुरुचरणी ।

हीच प्रार्थना सद्गुरु आई आपुल्या चरणी ॥ ९ ॥

– श्रीकृष्णाची मीरा

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now