महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने जकार्ता (इंडोनेशिया) येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाची तेथील हिंदु धर्मप्रमुखांशी भेट

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. विनायक शानभाग, श्री. गोपालन्, प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या, पू. रेन्डी एकारांतियो आणि अधिवक्ता नगकान पुतु पुत्रा

जकार्ता (इंडोनेशिया) – महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाने तेथील हिंदु धर्मप्रमुखांची नुकतीच भेट घेतली. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत आलेले कार्य, विश्‍वविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रेरणास्त्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशन’ (एस्.एस्.आर.एफ्.) यांविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना गोवा येथील ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट देण्याची विनंती केली.

या प्रसंगी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे जकार्ता येथील संत पू. रेन्डी एकारांतियो, इंडोनेशियाचे हिंदु मंत्रालयाचे मंत्री प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या, हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन्, ‘मीडिया हिंदू’ मासिकाचे संपादक अधिवक्ता नगकान पुतु पुत्रा, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक सौ. मोनिता आणि श्री. रघूमणि उपस्थित होते. सद्गुरु (सौ.) गाडगीळ ८ मार्चपासून १५ दिवसांच्या अभ्यासदौर्‍याकरिता इंडोनेशियाला गेल्या आहेत. या वेळी त्यांच्या समवेत विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी साधक श्री. विनायक शानभाग, श्री. दिवाकर आगावणे, श्री. स्नेहल राऊत आणि श्री. सत्यकाम कणगलेकर हेही उपस्थित होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेले कार्य अमूल्य आहे ! – प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या, जकार्ता

या वेळी प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या म्हणाले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेले कार्य अमूल्य आहे. हिंदु मंत्रालयाच्या अंतर्गत इंडोनेशियामध्ये एकूण ११ विश्‍वविद्यालये आहेत. पुढील काळात आम्ही या सर्व विश्‍वविद्यालयांच्या वतीने विशेष करार करू. त्यामुळे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या संशोधनाचा लाभ आमच्या विद्यार्थांनाही होईल.’’

क्षणचित्रे

१. पू. रेन्डी एकारांतियो यांनी इंडोनेशिया येथील हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् यांची भेट घेतली आणि त्यांना भारतातून सद्गुरु

सौ. गाडगीळ जकार्ता येथे आल्याची माहिती दिली. तेव्हा लगेच त्यांनी वरील भेटीचे आयोजन केले.

२. या वेळी उपस्थित असलेले अधिवक्ता नगकान पुतु पुत्रा म्हणाले, ‘‘आम्ही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि हिंदु धर्माविषयी लिहिलेले लेख इंडोनेशियातील ‘बहासा’ भाषेत भाषांतरित करून आमच्या ‘मीडिया हिंदू’ या मासिकात प्रसिद्ध करू.’’

३. श्री. गोपालन् यांनी सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांना ‘सनातन धर्म गेमा साधना’ या संघटनेच्या विशेष कार्यकर्ता शिबिरात हिंदु धर्माविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या वेळी श्री. गोपालन् यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनासाठी इंडोनेशिया येथे ६ एकर भूमी अल्प दरात देऊ केली.

४. प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या हे त्यांची बाली द्वीपावरील महत्त्वाची बैठक रहित करून सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांना भेटायला आले होते.

५. ‘इंडोनेशिया येथील हिंदु मंत्रालयाने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात देऊ’, असे प्राचार्य श्री. केटूट् विद्न्या यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now