लोकमानस !

संपादकीय

काँग्रेस मुसलमानांचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी ठरला असला, तरी ते सत्य नाही, असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हा खुलासा केला. का, कुणास ठाऊक ! पण सोनियाजी मात्र राजकारण सोडून दुसर्‍या कोणत्याच विषयावर कधी बोलत नाही. सध्या तर त्यांचा पक्ष मरणपंथाला लागल्यासारखा झाला आहे. त्याला उर्जितावस्था प्राप्त करून देणे आज आवश्यक असतांना विरोधकांवर किंबहुना राज्यकर्त्या भाजपवर चिखलफेक करण्यात काँग्रेसी नेत्यांना श्रेय मिळत असल्याचे वाटते. देशावर सत्ता गाजवणे, एवढेच जीवनाचे ध्येय ठरवून घेतल्याप्रमाणे त्यांचे बोलणे असते. गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी देशातील बहुसंख्य हिंदूंच्या साहाय्याची आवश्यकता त्यांना जाणवायला लागली आहे, असे वाटते. त्यासाठी त्या म्हणतात, ‘‘आम्ही मंदिरात नेहमीच जात होतो आणि जात आहोत. राजीव गांधी यांच्यासमवेत फिरतांना स्थानिक मंदिरांमध्ये आम्ही जात होतो; मात्र आम्ही त्याचा कधी प्रचार केला नाही.’’ हे सर्व त्या कशासाठी सांगत आहेत ? भारतवासियांकडून काहीतरी अपेक्षा असल्यावाचून त्या हे सर्व बोलत आहेत का ? मंदिरात जाणे हा प्रत्येक हिंदूचा दिनक्रम असतो. त्याला प्रसिद्धी मिळावी, असा त्याचा कधीच हेतू नसतो. मंदिरात जाणे हा एखाद्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यात राजकारण करण्याचा किंवा ‘चमकायचा’ भाग नसतो. राजकीय नेता देवळात जातानांचा देखावा दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होतो. त्यातून काय साध्य केले जाते ? निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे का ? हा सर्वसामान्य मतप्रवाह असून काँग्रेसी नेते मात्र त्याला बगल देतात. सत्तेसाठी हा पक्ष भूकेला असतो. हा पक्ष सत्तापिपासू आहे. लोकसेवा हे सूत्र त्यांच्या शब्दकोशात नाही. वर्ष २०१९ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असेही त्या म्हणाल्या. म्हणजे त्यांना जेव्हा तेव्हा राजकीय सत्ताच दिसते. भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, असे त्या वारंवार म्हणत असतात. विरोधी पक्षांची त्यांनी अलीकडे एक बैठकही घेतली. त्यांना राजकीय सत्तेपलीकडे दुसरे काहीच दिसत नाही. त्यासाठीच त्यांनी भाजप या पक्षावर वर म्हटल्याप्रमाणे आरोप केला आहे. म्हणे, ‘काँग्रेस मुसलमानांचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी ठरला आहे.’ मतें मिळवण्यासाठी असे फोडाफोडीचे धोरण राबवायला त्यांना काहीच वाटत नाही. ही नीती त्यांच्या पक्षाने इंग्रजांकडून ग्रहण केली आहे, हे भारतीय जनता ओळखून आहे. सुज्ञ मतदार जनतेला हे सर्व माहीत आहे. तेव्हा सत्तासंपादनासाठी देशविरोधी धोरण अंगीकारण्यापेक्षा लोकमानसाचा आदर करायला काँग्रेसी नेत्यांनी शिकावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now