उपवासाच्या दिवशी पाळायचे नियम

आज फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्थी अर्थात् संकष्ट चतुर्थी असल्याच्या निमित्ताने…

१. प्रातःकाळी करायच्या गोष्टी

अ. ‘नेहमीपेक्षा लवकर उठावे.

आ. जाग आल्यावर आपल्या इष्टदेवाचे स्वरूप आठवून त्याचे स्मरण करावे.

इ. शौच, व्यायाम, स्नान इत्यादी गोष्टी केल्यानंतर एक किंवा त्यापेक्षा अधिक माळा नामजप करावा.

२. संकल्प

त्या दिवशी ‘ईश्‍वराच्या भक्तीत पूर्ण समर्पित होऊन उपवास करीन आणि त्याच्या सहवासात राहीन’, असा संकल्प करावा. या संकल्पाला मानसिक महत्त्व आहे.

३. आहार

अ. रजोगुणी अन् तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

आ. पचायला हलका, पौष्टिक आणि सात्त्विक आहार घ्यावा.

इ. शक्य असल्यास रसाळ मधुर फळे आणि दूध घ्यावे.

४. लक्षात ठेवायच्या काही गोष्टी

अ. काम (वासना, इच्छा), क्रोध, मद आणि लोभ या मनोविकारांना दूर ठेवावे. कुणालाही मानसिक आणि शारीरिक कष्ट न देता अधिकाधिक आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा.

आ. काही घंटे वाचिक (तोंडाने) आणि मानसिक स्तरावर मौन पाळावे.

५. सायंकाळी इष्टदेवाचे दर्शन घ्यावे.

६. रात्री झोपण्यापूर्वी काय करावे ?

अ. इष्टदेवाचे स्वरूप आठवून त्याचे चिंतन करावे.

आ.‘दिवसभरात कुठे कोणत्या चुका झाल्या ?’, याचे आत्मपरीक्षण करावे.

अशा प्रकारे एक दिवसाचा उपवासही शारीरिक आणि मानसिक सुख देणारी एक दिवसाची तपस्याच होईल.’

(‘मासिक कल्याण’, ऑक्टोबर १९९३)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now