परात्पर गुरु डॉक्टरांचे एक वाक्य १७ वर्षांनंतर जयपूर येथील उद्योजक श्री. सुरेश दळवी यांनी जसेच्या तसे सांगणे आणि त्यावरून ‘संतांच्या वाणीतील चैतन्याचा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर किती खोलवर परिणाम होतो’, हे शिकायला मिळणे

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

परात्पर गुरु डॉ. आठवले
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘पूर्वी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे जाहीर सभांमधून साधनेविषयी मार्गदर्शन करायचे. वर्ष २००० मध्ये पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रस्ता) येथे झालेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या जाहीर सभेला जयपूर येथील उद्योजक श्री. सुरेश दळवी (हे मूळचे पुणे येथील आहेत.) उपस्थित होते. त्या वेळी सभा झाल्यानंतर शंकानिरसन सत्राच्या वेळी एका जिज्ञासूने परात्पर गुरु डॉक्टरांना ‘अध्यात्म आणि विज्ञान यांमध्ये भेद काय ?’, असा प्रश्‍न विचारला होता. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिले, ‘‘जे डोळ्यांना दिसते (बुद्धीला समजते), ते विज्ञान आणि जे त्याच्या (बुद्धीच्या) पलीकडे आहे, ते अध्यात्म !’’

 

नोव्हेंबर २०१७ मध्ये माझी आणि श्री. दळवी यांची भेट झाल्यावर त्यांनी मला वरील प्रसंग सांगितला. तेव्हा श्री. दळवी म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांचे हे वाक्य अन् त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली.’’ या प्रसंगातून ‘संतांचे चैतन्य आणि त्यांची चैतन्यमय वाणी यांचा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर किती मोठ्या प्रमाणात खोलवर परिणाम होत असतो ?’, हे मला शिकायला मिळाले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (नोव्हेंबर २०१७)      

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF