श्रीलंकेत ख्रिस्ती पाद्य्राचा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमानी हिंदूंनी रोखला

श्रीलंकेतील धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि जन्महिंदू काही आदर्श घेतील का ?

मरवनपुलावु सच्चिदानंदन्जी यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंची संघटित कृती

श्रीलंका – एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्‍यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये आले होते. त्या गावातील हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने त्यांनी गावात प्रवेश केला होता. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू भरल्या होत्या. संयुक्त राष्ट्र संघातील श्रीलंकेचे निवृत्त अधिकारी आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन्जी यांच्या नेतृत्वाखाली गावातील हिंदूंनी अनुमाने १ सहस्र घरांवर फलक लावून त्यावर पुढील संदेश लिहिला होता, ही भगवान शिवाची भूमी आहे. या भूमीत कोणीही धर्मांतरासाठी प्रवेश करू नये. तसेच प्रत्येक घरासमोर भगवान नंदीचा ध्वज उभारण्यात आला होता.

ख्रिस्ती पाद्य्राने हे फलक वाचले आणि त्यांनी आसपासच्या लोकांशी संपर्क साधून तेथील स्थिती जाणून घेतली. त्यानंतर ते साहित्यांसह परत निघून गेले. तेव्हापासून गावात धर्मांतरासाठी कोणीही प्रवेश केलेला नाही, अशी माहिती गावातील एक रहिवाशी श्री. सिवानेसन् यांनी दिली. गावात लावण्यात आलेले सर्व फलक आणि ध्वज मूळ श्रीलंकेतील असलेल्या एका विदेशी व्यक्तीने पुरस्कृत केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now