पार्वतीदेवी आणि अर्जुन यांच्याप्रमाणे कठोर साधना करणे अशक्य असल्याने गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा सोपा साधनामार्ग दाखवणे

कु. सर्वमंगळा मेदी

‘महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवर शिवतत्त्व सहस्त्रो पटींनी कार्यरत असते; म्हणून सर्व जण भगवान शिवाची उपासना करून शिवतत्त्व मिळवतात आणि साधनेत पुढे जातात. या दिवशी भगवान शिवाची कठोर तपस्या करून त्याचे मन जिंकणार्‍या अग्रगण्य महादेवी पार्वतीदेवीचे स्मरण होते. आई पार्वतीदेवीने कठोर तप करून सर्वेश्‍वराची कृपा संपादन केली आणि ती ‘सर्वमंगळा’ या नावाने ओळखली गेली. ती शिवाची प्रथम शिष्या म्हणून ओेळखली जाते. पार्वतीदेवीने राक्षसांचा संहार करून धर्मस्थापना केली.

प्रत्येक सोमवारी व्रत करत असतांना शिवपुराणात वाचले होते की, गुरु-शिष्य परंपरेमध्ये भगवान शिव आदी गुरु आणि पार्वतीदेवी आदी शिष्या आहे. गुरु-शिष्य यांच्या संकल्पाने ब्रह्मांडातील अधर्माचा नाश करून धर्मसंस्थापना केल्याचे लक्षात येते, उदा. शिव-पार्वती यांच्याकडून असुरांचा, श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यापासून अधर्मी कौरवांचा, चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर आणि बुक्कराय, समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज.

शिवोपासना करणार्‍या साधिकेकडे कृपाळू नयनांनी पहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सुदर्शनचक्रधारी श्रीकृष्ण
शिवपिंडीसमोर बसून आराधना करणारी पार्वतीमाता आणि तिच्यावर कृपाकटाक्ष टाकणारे भगवान शिव

जिथे शिव गुरु होते, तिथे आई पार्वती शिष्य होते ।

त्यांनी असुरांचा नाश करून धर्मस्थापना केली ॥

जिथे कृष्ण गुरु आहे, तिथे अर्जुन शिष्य होते ।

त्यांनी कौरवांचा नाश करून धर्मसंस्थापना केली ॥

जिथे विष्णुगुप्त (चाणक्य) गुरु होते, तिथे चंद्रगुप्त शिष्य होते ।

त्यांनी अधर्मी नंदवंशाचा नाश करून धर्मसंस्थापना केली ॥

जिथे शंकराचार्य गुरु होते,

तिथे भारताच्या चारही पिठांमध्ये शिष्य होते ।

त्यांनी अधर्मींचा (अघोरींचा) नाश करून धर्मसंस्थापना केली ॥

जिथे विद्यारण्य होते, तिथे हरिहर आणि बुक्कराय शिष्य होते ।

त्यांनी अधर्मी सुलतानांचा नाश करून धर्मसंस्थापना केली ॥

जिथे समर्थ रामदासस्वामी गुरु होते,

तिथे शिवाजी महाराज शिष्य होते ।

यांनी अधर्मी मोगलांचा नाश करून धर्मसंस्थापना केली ॥

जिथे रामकृष्ण गुरु होते, तिथे विवेकानंद शिष्य होते ।

यांनी अधर्मांचा नाश करून पृथ्वीवर हिंदु धर्माचा प्रसार केला ॥

जिथे परात्पर गुरु डॉक्टर आठवले गुरु आहेत,

तिथे सनातनचे संत-शिष्य आहेत ।

तेथे अधर्माचा नाश होऊन धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्य स्थापन होणार हे निश्‍चित आहे ॥

यत्र योगेश्‍वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्‍लोक ७८ ॥

अर्थ : जेथे योगेश्‍वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ (अर्थात पृथापुत्र अर्जुन) आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे.

आई दुर्गादेवीप्रमाणे, आदी शिष्या पार्वतीदेवीप्रमाणे आणि शिष्य अर्जुनाप्रमाणे कठोर साधना करणे आपल्याला अशक्य आहे; म्हणून गुरुदेवांनी आम्हा साधकांसाठी गुरुकृपायोगासारखा अध्यात्माचा सोपा मार्ग दाखवला आहे, तरीही गुरूंना अपेक्षित अशी साधना केली जात नाही.

‘हे गुरुदेवा, आई भवानीदेवीप्रमाणे, माता पार्वतीदेवीप्रमाणे आम्हा साधकांना एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणाने साधना करता येऊ दे. गुरुकृपायोगाचा जो मार्ग तुम्ही दाखवला आहे, त्या मार्गाने जाण्यासाठी आम्हा सर्व साधकांना शक्ती, भक्ती, बुद्धी, युक्ती आणि धैर्य देऊन आमच्यावर कृपा करा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’

– कु. सर्वमंगळा मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०१८)