श्रीनगर येथील ‘सी.आर्.पी.एफ्.’च्या तळावर आतंकवादी आक्रमणाचा प्रयत्न

एक सैनिक हुतात्मा

वारंवार आक्रमणे करणार्‍या आतंकवाद्यांचा बीमोड करू न शकणारे सरकार पाकच्या लष्कराशी कसे लढणार ?

श्रीनगर – सुंजवान येथील सैन्यतळावरील आतंकवादी आक्रमण होऊन २४ घंटे उलटत नाही, तोच ११ फेबु्रवारीला सकाळी आतंकवाद्यांनी श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) तळावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सैनिकांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर आतंकवाद्यांनी तेथून पळ काढला. २ आतंकवादी ‘सी.आर्.पी.एफ्.’ मुख्यालयाजवळील इमारतीत लपून बसले. या आतंकवाद्यांना सैनिकांनी घेरले. या वेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला. सैनिकांनी परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हालवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now