(म्हणे) ‘भाजपला मत देऊ नका !’- नागालॅण्डमधील चर्चचे आवाहन

  • निधर्मीपणाचा डंका पिटणारे चर्चच्या या चिथावणीखोर आवाहनाविषयी गप्प का ?
  • असे चिथावणीखोर आवाहन करणार्‍यांचे मताधिकार काढून घेण्याची कारवाई निवडणूक आयोग करणार का ?

कोहिमा – नागालॅण्डमधील सर्व चर्चची शिखर संघटना असलेल्या ‘नागालॅण्ड बाप्टिस्ट चर्च काऊन्सिल’ने (‘एन्.बी.सी.सी.’ने) केंद्र सरकारला जाहीर विरोध करत भाजपला मत न देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नागालॅण्ड, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभेसाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. नागालॅण्डमध्ये सध्या ‘नागालॅण्ड पीपल्स फ्रंट’समवेत भाजप सत्तेत आहे. यापूर्वी गुजरातमधील चर्चने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन लोकांना केले होते. (भाजपने अन्य पंथियांसाठी कितीही केले, तरी ते भाजपला शत्रूच मानतात, हेच यावरून सिद्ध होते ! त्यामुळे भाजपने आतातरी ‘भाजपला हिंदूंविना कुणीही वाली नाही’, हे वेळीच ओळखावे आणि हिंदुहितासाठी काम करावे ! – संपादक)

(म्हणे) ‘नागालॅण्ड हे ख्रिस्तीबहुल राज्य असून येथे हिंदुत्वनिष्ठ शक्तींच्या घुसखोरीला आम्ही तीव्र विरोध करू !’ – नागालॅण्डमधील चर्चची चेतावणी

नागालॅण्ड भारतात आहे कि युरोपात ?

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘एन्.बी.सी.सी.’ने पत्रक काढले असून त्यात महासचिव रिव झेलहोऊ केयहो यांनी म्हटले आहे की, नागालॅण्ड हे ख्रिस्तीबहुल राज्य असून येथे हिंदुत्वनिष्ठ शक्तींच्या ‘घुसखोरी’ला (!) आम्ही तीव्र विरोध करू. (कुठलाही प्रांत मुसलमानबहुल अथवा ख्रिस्तीबहुल झाल्यावर ते लोकशाही पायदळी तुडवतात, तसेच हिंदूंनाही झिडकारतात, हेच अनुक्रमे काश्मीर आणि नागालॅण्ड येथील परिस्थितीवरून सिद्ध होते ! ‘स्वपंथ वाढवण्यासाठी लोकशाहीचा असा सोयीस्कर वापर हिंदूंच्या मुळावर उठणारा आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ? यास्तव हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक) हिंदुत्वाच्या प्रचारासाठी देशात सध्या खूप आक्रमक पद्धतीने मोहीम चालू आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दिशेने युद्धपातळीवर काम करत आहेत.’’