आपलेे स्वभावदोष बाहेर काढल्याने ते रिकामे स्थान देव त्याच्या चैतन्याने भरून काढत असल्याने मन सतत रिकामे ठेवणे आवश्यक !

परात्पर गुरु पांडे महाराज

‘आपल्या मनातील विचार सतत बाहेर टाकत रहायचे. आपल्या मनातले सतत दुसर्‍याला किंवा देवाला सांगावे आणि मन रिकामे करावे, उदा. पूर्वीचे राजे लोक नियमितपणे दान करत असत. त्यांच्याकडे कुणी भिक्षा मागायला आले की, ते त्यांना काही ना काही देतच असत. प्रसंगी अगदी अंगावरचे मौल्यवान अलंकारही झटकन काढून देत असत. त्यामुळे दान केलेल्या वस्तूचे स्थान रिकामे व्हायचे; म्हणून त्यांना भगवंतही भरभरून देत असे, तसेच आपल्या मनात जे वेडेवाकडे विचार येतात, जे स्वभावदोष आहेत, ते बाहेर काढल्याने ते रिकामे स्थान देव त्याच्या चैतन्याने भरून काढतो; म्हणून सतत मन रिकामे करत रहायचे.’ – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल.