प्रदक्षिणा

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत जे सूत्र, म्हणजे नाला जातो, त्याला सोमसूत्र म्हणतात. प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. शाळुंकेच्या स्त्रोताला ओलांडत नाहीत, कारण तेथे शक्तीस्त्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती अन् पाच अंतस्थ वायु यांवर विपरीत परिणाम होतो.