विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी धर्मकार्यार्थ कृतीशील होणार !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांचा नागपूर दौरा !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या नागपूर दौर्‍यात अनेक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, संत यांच्याशी संपर्क झाले. सर्व धर्माभिमानी पुष्कळ सकारात्मक असून त्यांनी समितीचे कार्य सविस्तर जाणून घेतले. समितीच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची सर्वांनीच सिद्धता दर्शवली.

धर्माची राष्ट्रीय स्तरावर सामायिक कार्यपद्धत असावी !  – श्री. अजय कुमार सिंह, अध्यक्ष, ग्लोबल अडवायझरी कौन्सिल

श्री. अजय कुमार सिंह (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. सुनील घनवट

धर्माची राष्ट्रीय स्तरावर एकच कार्यपद्धत हवी. त्या कार्यपद्धतीत विविध संस्थांना सभासद म्हणून एकत्रित करायला हवे. यासंदर्भात सरकारकडे निवेदन पाठवणेही आवश्यक आहे. विश्‍वातील हिंदूंमध्ये आपल्यापेक्षा देशप्रेमाची भावना १० पट अधिक असते.

सनातन संस्थेवर आतापर्यंत पुष्कळ आरोप करण्यात आले; पण माझा संस्थेच्या कार्यावर विश्‍वास आहे. हे कार्य चांगले असून मीही त्या कार्यात सहभागी होण्यास सिद्ध आहे.

रामायण आचरण्याची आवश्यकता आहे ! – पू. संत श्री भागिरथी महाराज

पू. संत श्री भगिरथी महाराज (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. सुनील घनवट

रामायण हा आमचा आरसा आहे. ते केवळ ऐकण्याचे नाही, तर त्यानुसार आचरण करण्याची आज आवश्यकता आहे. आपण हिंदू पुष्कळ सण-उत्सव साजरे करतो; पण आपण अजूनही संघटित नाही. अनेक संत मार्गदर्शन करतात; पण ते केवळ स्वतःचे नाव मोठे होण्यासाठीच ! आपण परोपकाराचे जीवन जगायला हवे. (समितीचे कार्य ऐकून त्यांना पुष्कळ आनंद झाला. समितीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.)

पू. संत श्री भागिरथी महाराज यांचा परिचय

महाराजांनी सर्व संप्रदाय, संघटना एकत्रित करण्याच्या उद्देशाने मागील मासात बेलतरोडी, नागपूर येथील आश्रमात समरसता यज्ञ केला होता. त्यांनी संघटितपणे केलेल्या प्रबोधनानंतर श्री महालक्ष्मी मंदिर, कोरडी येथे बळी देणे ही प्रथा संपुष्टात आली. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांनी जोडले असून ते धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन यावर प्रभावीपणे मार्गदर्शन करतात.

विविध मान्यवरांना राष्ट्र-धर्म यांविषयीचे ग्रंथ भेट !

श्री. गोविंद राठी (मध्यभागी) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. सुनील घनवट

व्यावसायिक श्री. वामन जोशी, भूमिपुत्र युवा संघटनेचे संस्थापक श्री. चंदूजी बिनेकर, इव्हेंट मॅनेजमेण्टचे श्री. गोविंद राठी, अधिवक्ता श्री. सतीश देशपांडे, व्यावसायिक श्री. राहुल आसरे, भाजपचे क्रीडा विभागाचे श्री. सुधीर अभ्यंकर, श्री. प्रकाश खानझोडे यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

सर्वच मान्यवरांनी अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मप्रेमी, गोरक्षक यांना जोडण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. समितीचे व्यापक कार्य जाणून घेण्यासाठी संबंधित मान्यवर त्यांच्या बैठकांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांना विषय मांडण्यासाठी बोलावणार असल्याचे सांगितले. समितीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत सहभागी होणे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या उभारणीसाठी सहकार्य करणे, आयुर्वेदिक वनस्पती लागवडीसाठी भूमी उपलब्ध करून देणे, समितीला कायदेविषयक कार्यात साहाय्य करणे, सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देणे, ग्रंथांचे प्रायोजकत्व मिळवण्यासाठी साहाय्य करणे आणि सनातन प्रभातचे वाचक होणे यांसाठी सहकार्य करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now