रशियाचे प्रवासी विमान कोसळून ७१ ठार

मॉस्को (रशिया) – रशियाच्या सारातोव एअरलाइन्सचे अँतोनोव एन-१४८ हे विमान मॉस्को शहराच्या बाहेर कोसळून झालेल्या अपघातात ७१ प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ओर्स्कला जात होते. या विमानात ६५ प्रवासी होते, तसेच पायलटसह अन्य ६ जण होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अंश सापडले असून सरकारने तेथे साहाय्यासाठी एक पथक पाठवले आहे, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now