सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या व्यापक हेतूंनी आयोजित केल्या जाणार्‍या नानाविध कार्यक्रमांकरता सभागृह वा मैदान उपलब्ध करून द्यावे !

१. धर्मप्रेमींमध्ये कृतीप्रवणता निर्माण करणारे समितीचे विविध कार्यक्रम !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा, हिंदूसंघटन मेळावे, हिंदू अधिवेशने आदी राष्ट्र आणि धर्म जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदु संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या कार्यक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून अनेक हिंदु बांधव धर्मकार्यासाठी कृतीशील होत आहेत. ‘असे कार्यक्रम आमच्या शहरातही आयोजित करा’, अशी मागणी बरेच धर्मप्रेमी करत आहेत.

२. कार्यक्रमांसाठी सभागृह वा मैदान यांची आवश्यकता !

धर्मप्रेमींच्या मागणीनुसार सभा, अधिवेशन आदींचे अनेक शहरात आयोजन करण्यासाठी समिती प्रयत्नरत आहे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी त्यासाठी स्वतःचे अथवा परिचितांचे सभागृह वा मैदान (मोकळी जागा) उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात हातभार लावावा. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, औद्योगिक केंद्रे, सहकारी गृहनिर्माण संस्था (‘को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’) यांचे सभागृह वा मैदान उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न करता येईल.

आपल्या शहरात स्वतःचे अथवा इतरांचे सभागृह वा मैदान विनामूल्य किंवा अल्प दरात उपलब्ध होत असेल, तर त्याविषयीची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर किंवा पुढे दिलेल्या टपाल पत्त्यावर पाठवावी. संगणकीय पत्ता नसल्यास श्री. शिवाजी वटकर यांना ९३२२५३३५९५ या क्रमांकावर कळवावे.

(टपालासाठी पत्ता : श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट – ओ.एन्.जी.सी., तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड ४१०२२१’)

महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांत विशाल हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी अनेक धर्मप्रेमी सहकार्य करत आहेत. धुळे येथील सभेकरता श्री. जुगलकिशोर बन्सीलाल गिंदोडिया या हितचिंतकांनी मैदान उपलब्ध करून दिले होते. तेथे सभा पार पडल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. ते म्हणाले, ‘‘आज खर्‍या अर्थाने हे मैदान पवित्र झाले. अशा सभांसाठी माझे मैदान नेहमीच विनामूल्य उपलब्ध राहील.’’