चीनचा मालदीवमधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी डोकेदुखी ! – मालदीवच्या माजी राष्ट्रपतींची चेतावणी

धूर्त चीनच्या क्लुप्त्या ओळखून भारतीय शासनकर्ते त्याला काटशह कधी देणार ?

नवी देहली – मालदीवमधील राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारविरोधात भारताने कारवाई करणे आवश्यक आहे; कारण मालदीवमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि इस्लामी कट्टरतावाद या दोन्ही गोष्टी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे भारताने मालदीवमधील परिस्थिती सुधारण्यास साहाय्य करावे, अशी आवाहनपर चेतावणी मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नशीद यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, चीनने मालदीवजवळच्या १७ बेटांवर आतापर्यंत ताबा मिळवला असून तेथे तो २६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यावरून चीनच्या उद्देशांचे अनुमान करता येईल. चीनची मनमानी रोखण्यासाठी एका विशेष परिषदेचे आयोजन करून त्यामध्ये संधी करार करण्यात यावा आणि त्यावर चीनची सहमती घेण्यात यावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now