पाककडून राजौरी आणि पुंछमध्ये गोळीबार

श्रीनगर – पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी आणि पुंछ येथे गोळीबार केला. या गोळीबारात १ मुलगी गंभीररित्या घायाळ झाली. पाककडून गेल्या १५ दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही पाचवी वेळ आहे. पाकच्या सैनिकांनी शहापूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर आक्रमण केले, तसेच सीमेलगतच्या गावांवरही गोळीबार केला. (पाकची ही डोकेदुखी सरकार कधी संपवणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now