आम्हीही स्वबळावर निवडणुका लढण्यास सक्षम आहोत ! – चंद्राबाबू नायडू, तेलुगू देसम पक्ष

एनडीएमधून बाहेर पडण्याचे तेलुगू देसम पार्टीचे संकेत

नवी देहली – तेलुगू देसम पक्षाचे नेते तथा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीएतून) बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आम्हीही स्वबळावर निवडणुका लढण्यास सक्षम आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आघाडीतून बाहेर पडणारा तेलुगू देसम हा दुसरा पक्ष ठरणार आहे. तेलुगू देसम हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष आहे. पक्षाने वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची सिद्धता चालू केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे घोषित केले होते.


Multi Language |Offline reading | PDF