चारा घोटाळ्याच्या तिसर्‍या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

२१ वर्षांनी निकाल

  • एका प्रकरणाचा निकाल लागायला २१ वर्षे लागणे, हे न्यायप्रणाली सक्षम नसल्याचेच द्योतक ! सरकार यातील त्रुटी दूर करून सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी पावले उचलणार का ?
  • सत्तेचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करू देणारी लोकशाही निरर्थक ! यास्तव हिंदु राष्ट्र हवे !

रांची (बिहार) – कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय.च्या) विशेष न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा ठोठावली. याशिवाय त्यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

एकूण ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्यातील ४ घोटाळ्यांपैकी हा १ घोटाळा आहे. चाईबासा शासकीय कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रुपये अवैध मार्गाने काढल्याच्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावण्यात आली. याच प्रकरणात बिहारचे आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांनाही वरीलप्रमाणेच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घोटाळ्यातील एकूण ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांना देवघर शासकीय कोषागार घोटाळ्याच्या प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्या प्रकरणी सध्या ते रांचीच्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ही साडेतान वर्षांची शिक्षा मिळून त्यांना एकूण साडेआठ वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

वर्ष १९९१ ते १९९७ या कालावधीत ९५० कोटी रुपयांचा चारा घोटाळा झाला होता. त्यापैकी चाईबासा कोषागार घोटाळ्याच्या प्रकरणी १२ डिसेंबर २००१ ला ७६ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणातील लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ६ नेत्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १४ आरोपींचा मृत्यू झाला आहे.

(म्हणे) लालूप्रसाद यादव यांना अडकवण्याचे षड्यंत्र ! – तेजस्वी यादव

लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यादव यांना या घोटाळ्यात फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले, भाजप, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यांना या घोटाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र रचले आहे. केवळ लालूंना या घोटाळ्यात अडकवणे हेच त्यांचे लक्ष्य आहे. बिहारचा विकास करायचा सोडून हे लोक लालूप्रसाद यांच्यावर सूड उगवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. तथापि आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखतो. याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now