सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नावातील शब्दांचा देवद आश्रमातील सौ. मीना खळतकर यांना जाणवलेला भावार्थ !

३०.६.२०१७ या दिवशी सायंकाळी प्रसाद घेतल्यानंतर माझ्याकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे असे नाव उच्चारले गेले आणि त्वरित त्यांच्या नावातील शब्दांचा अर्थ ध्यानी येऊ लागला. तो अर्थ पुढे दिला आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

स – समर्पित भाव असणारे, सर्वांशी जुळवून घेणारे, संपूर्ण जीवन धर्मकार्यासाठी अर्पण करणारे आणि ईश्‍वराचे सगुण रूप असणारे

द् – हनुमानाप्रमाणे दास्यभक्ती असणारे आणि दायित्व सांभाळणारे

सौ. मीना खळतकर

गु – गुरुचरणी अनन्यभावे लीन असणारे आणि गुरूंचे आज्ञापालन करणारे

रु – रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र असलेले, वेळप्रसंगी रुद्रावतार धारण करून साधकांना कडक शब्दांत चुकांची जाणीव करून देणारे अन् आपण गुरुमाऊलीच्या ऋणांत आहोत, याची अखंड जाणीव असणारे

चा – चाणक्याप्रमाणे बुद्धीमत्ता असलेलेे

रु – गुरुदेवांच्या ऋणात राहून साधना करणारे

द – ज्ञान-भक्तीचा दरवळणारा सुगंध म्हणजे सद्गुरु काका !

त्त – तीक्ष्ण बुद्धीमत्ता असलेले

पिं – पिंपळ (अश्‍वत्थ) वृक्षाप्रमाणे सर्वांचा आधार असणारे

ग – गरुडाप्रमाणे साधनेत उंच भरारी घेऊन प्रगती करणारे आणि गंगेप्रमाणे निर्मळ मन असलेले

ळे – चैतन्याचे मळे फुलवणारे

सर्वांना हवेहवेसे वाटणारे आम्हा सर्वांचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याप्रमाणे आम्हा सर्व साधकांना साधनेत उंच भरारी घेता येवो आणि तसे प्रयत्न करण्यासाठी बळ मिळो, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now