सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘माखनलाल चतुर्वेदी विश्‍वविद्यालया’च्या कुलपतींशी सदिच्छा भेट

भोपाळ – सारनाथ (वाराणसी) येथे ‘अध्यात्म का विस्तार तथा सोशल मीडिया’ या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या काही दिवस अगोदर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालया’चे कुलपती प्रा. बृज किशोर कुठियाला यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, तसेच समितीचे श्री. गिरीश आगरकर उपस्थित होते.

डावीकडून प्रा. (सौ.) मीना अग्रवाल, प्रा. चैतन्य अग्रवाल, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. गिरीश आगरकर
प्रा. बृज किशोर कुठियाला यांना माहिती सांगतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी प्रा. कुठियाला यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयद्वारे चालणार्‍या शोधकार्याविषयी अवगत केले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरपर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे केला जात आहे. या कार्याची प्रशंसा करतांना प्रा. कुठियाला यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना सारनाथ येथे होणार्‍या अध्यात्म आणि सोशल मीडियाच्या संमेलनात वक्ता म्हणून निमंत्रण दिले होते. या प्रसंगी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी प्रा. कुठियाला यांना ‘अध्यात्मका प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ भेट दिला.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्राध्यापक चैतन्य अग्रवाल यांच्याशीही सदिच्छा भेट

यानंतर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक श्री. चैतन्य अग्रवाल यांचीही सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीश आगरकर उपस्थित होते. त्यांनाही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून केल्या जाणार्‍या संशोधन कार्याविषयी माहिती देण्यात आली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शोधकार्याची प्रशंसा करतांना श्री. अग्रवाल यांनी भविष्यात या शोधकार्यास साहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रसंगी प्रा. अग्रवाल यांच्या धर्मपत्नी तथा ‘मौलाना आझाद राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थाना’च्या ऊर्जा विभागाच्या प्राध्यापिका मीना अग्रवाल उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रा. अग्रवाल यांनी शोधकार्य, तसेच साधना यांविषयीचे त्यांचे अनुभव सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF