अलीगड(उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शाळेतील पाठ्यपुस्तकात डॉ. झाकीर नाईकचा ‘हिरो’ असा उल्लेख

सरकारी मान्यताप्राप्त शाळेतील धक्कादायक प्रकार

सरकार कारवाई करणार

  • धर्मांध डॉ. झाकीर नाईकचा पुस्तकातून उघडउघड उदो केला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ? या गुन्ह्यासाठी शाळा बंद करण्यासह शिक्षण विभागातील संबंधितांवरही कठोर कारवाई करा !
  • शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याला ‘शिक्षणाचे भगवेकरण’ केले जात असल्याची ओरड करणारे पुरो(अधो)गामी, निधर्मी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे यांची आता दातखिळी बसेल, याची निश्‍चिती बाळगा !
A page from the book that mentions Zakir Naik as an ‘important Islamic personality’.(HT Photo/Mahipal Singh)

अलीगड – आतंकवाद्यांना प्रोत्साहन देण्यासह इतर अनेक गुन्ह्यांत अन्वेषण यंत्रणांना हवा असलेला ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ (आय.आर्.एफ्.) या संस्थेचा संस्थापक डॉ. झाकीर नाईक हा हिरो असल्याची शिकवण अलीगडमधील दोदपूर येथील ‘इस्लामिक मिशन स्कूल’ या शाळेत दिली जात असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. यानंतर शाळेच्या प्रशासनाने सारवासारव करत डॉ. झाकीर नाईकचा विषय अभ्यासक्रमातून काढणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ही शाळा सरकारी मान्यताप्राप्त आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनीसुद्धा या घटनेचा योग्य तपास करून आवश्यक ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

‘इस्लामिक मिशन स्कूल’ या शाळेत दुसर्‍या इयत्तेतील विद्यार्थ्यांना इल्म-ए-उन नफे नावाचे पुस्तक शिकवले जाते. या पुस्तकातील २२ व्या धड्याचे नाव ‘हिरोज ऑफ इस्लाम’, असे आहे. या धड्यात इसरार अहमद, हारून याहया, मौलाना तारिक जमील, एस् अब्दुल्ला तारिक, यूसूफ एसेट्स, बिलाल फिलिप, मौलाना कलीम सिद्दीकी, शेख अहमद दीदत यांच्यासमवेत डॉ. झाकीर नाईकचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये आतंकवाद्यांना चिथावणी देणार्‍या झाकीर नाईकचा ‘हिरो’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. शाळेचे व्यवस्थापक कौसर म्हणाले, ‘‘हे पुस्तक २ वर्षांपूर्वी छापण्यात आले होते. त्या वेळी डॉ. झाकीर नाईकवर कोणताही आरोप नव्हता. नव्या आवृत्तीत झाकीर नाईकचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.’’ तथापि शाळेची माजी विद्यार्थिनी डेनिश हिने वर्ष २०१७ मध्ये ‘मला शाळेत वादग्रस्त झाकीर नाईकसंबंधी शिकवण्यात आले होते’, अशी माहिती दिली. जिल्हा शिक्षण अधिकारी धीरेंद्र सिंह म्हणाले, ‘‘या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली असून त्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर सदर शाळेची मान्यता काढून घेण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. ‘इस्लामिक मिशन स्कूल’ ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत. सदर पुस्तक हे शाळेने स्वत:च्या स्तरावर छापले आहे.’’

धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकवणे, आतंकवाद्यांना पैसा पुरवणे यांसह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील अन्वेषण यंत्रणांना वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हवा आहे. त्याला कायम वास्तव्याच्या परवान्याद्वारे मलेशियाने आश्रय दिला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now