हिंदु जनजागृती समिती निर्मित ‘मकरसंक्रांती’ धर्मसत्संगाविषयी महत्त्वाची सूचना

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

१४.१.२०१८ या दिवशी ‘मकरसंक्रांत’ आहे. त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती निर्मित मकरसंक्रांतीचे महत्त्व विशद करणारे हिंदी भाषेतील विशेष धर्मसत्संग प्रसारित करण्याविषयी सूचना ११.१.२०१८ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सत्संगात सत्संग-निर्मितीच्या वेळच्या प्रचलित रूढीनुसार दर्शकांना धार्मिक विधी करतांना आपलेपणा वाटावा, यासाठी काळी साडी परिधान करून सर्व धार्मिक विधी केल्याचे दर्शवले आहे; परंतु धर्मशास्त्रानुसार काळा रंग अशुभ असल्याने धार्मिक विधी करतांना काळी साडी परिधान करू नये. भविष्यात या धर्मसत्संगात धर्मशास्त्रानुसार सुधारणा करणार आहोत.

या धर्मसत्संगांची लिंक जिल्हासेवकांना पाठवण्यात आली आहे. साधक आणि कार्यकर्ते यांनी हे धर्मसत्संग त्या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now