हिंदूंनी स्वत:ची शक्ती आणि समस्या यांना ओळखायला हवे !

प्रा. रामेश्‍वर मिश्र

प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी ‘फेसबूक’वरून प्रसारित केले विचार !

आपण (हिंदू) आजही तुलनात्मकदृष्ट्या जगातील सर्वांत संघटित आणि एकत्रित समाज आहोत. हिंदूंनी या सत्याला आपल्या चित्तात स्थिर आणि दृढ केले पाहिजे. हिंदूंनी निरर्थक आत्मग्लानी त्यागून आपल्या तेजस्वितेमध्ये वृद्धी करायला हवी. शांत चित्ताने आपण आपल्यातील शक्ती आणि समस्या यांना ओळखायला हवे.

एक चांगला शासक सर्व समस्या सोडवू शकतो. जगाच्या तुलनेत आपल्या समस्या खूप न्यून आहेत. सध्याचे शासनकर्ते आपल्या इवल्याशा भूमिकेला वाढवून चढवून इतरांच्या शाबासक्या मिळवण्यासाठी समस्येचा डोंगर बनवतात. मोदीजी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मात्र यांस अपवाद आहेत; परंतु यांस भाजप अपवाद नाही. भाजपमध्ये ही अतीसाधारण लोक आहेत; परंतु सध्याची व्यवस्था अशी मागणी करते की, राजकारणी अत्यंत असाधारण प्रतिभेचे असावेत.

या सत्याचा समाजात प्रचार न झाल्याने अत्यंत असाधारण व्यक्तीसुद्धा स्वत:ला गरीब, सर्वसाधारण आदी म्हणते (पण मानत नाही). मोदीजी यांच्यासारखी अती असाधारण व्यक्ती स्वत:ला ‘प्रधानसेवक’ म्हणते, परंतु हे अत्यंत चुकीचे आहे.

भारताला शासकाची म्हणजेच राजाची आवश्यकता आहे, सेवक तर भरपूर आहेत. राजाने स्वत:ला ‘सेवक’ म्हणणे, ही भाषा दीनतेचे लक्षण आहे. याच दीनतेला समाजात प्रसृत करण्यात आले आहे. आपली भाषा सम्यक का असू नये ? पंतप्रधान असणे, ही ‘आत्मगौरवा’ची स्थिती नव्हे का ?

– प्रा. रामेश्‍वर मिश्र, भारत शासनाचे माजी सांस्कृतिक सल्लागार तथा संस्थापक, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now