(म्हणे) ‘भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकन नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाणे टाळावे !’ – ट्रम्प सरकारचा अमेरिकन नागरिकांना सल्ला

न्यूयॉर्क – जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढल्या असून तेथे सामाजिक अशांतता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय भारत-पाक सीमेवर तणाव आहे. त्यामुळे भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनी पर्यटनासाठी शक्यतो जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नये. त्यांनी तेथे जाणे टाळावे; कारण आतंकवादी पर्यटनस्थळांनाही लक्ष्य करू शकतात, असा सल्ला ट्रम्प सरकारने अमेरिकच्या नागरिकांना दिला. भारतात बलात्काराचे प्रमाण वाढल्याने तेथे पर्यटनानिमित्त जाणार्‍या अमेरिकन महिला पर्यटकांनी सतर्क रहावे, तसेच एकटीने प्रवास करणे टाळावे, असाही सल्ला अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘फेसबूक’ आणि ‘ट्विटर पेज’वरील ‘अपडेट्स’कडे लक्ष द्यावे, अशीही सूचना अमेरिकेने केली आहे.