पाकमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या !

हिंसाचारात दोघांचा मृत्यू

पाकमध्ये असा आवाज कधी हिंदु मुलींवरील अत्याचारांच्या आणि त्यांच्या हत्यांच्या विरोधात उठवला गेला आहे का ?

कराची – पाकमधील पंजाब प्रांतातील कासुर जिल्ह्यात रहाणार्‍या एका ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेतले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सहस्रो लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केले. १० जानेवारी या दिवशी पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात दोघा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

गेल्या आठवड्यात पीडित मुलीचे आई-वडील तीर्थयात्रेसाठी गेले असतांना या मुलीचे अपहरण करण्यात आले. त्या वेळी ती नातेवाइकांसमवेत रहात होती. ९ जानेवारीला तिचे शव कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळले. पोलिसांनी मुलीचे शव कह्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यात तिच्यावर बलात्कार करून नंतर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.