रामनाथी आश्रमात नामजप करतांना एस्.एस्.आर्.एफ्. च्या साधिका कु. अ‍ॅना ल्यु यांना आलेल्या अनुभूती

कु. अ‍ॅना ल्यु

मी वर्ष २०१७ मध्ये गोव्यातील सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी नामजप करतांना मला पुढील अनुभूती आल्या.

१. नामजप करतांना मला लगेच पुष्कळ शांत वाटले आणि माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.

२. नामजप करतांना मला एक पांढरा शुभ्र आणि सोन्याचे छत असलेला वाडा दिसला.

मला तेथील वातावरणात सगळीकडे आनंदाचे कण चमकतांना दिसत होते. त्या वेळी श्रीकृष्ण मला आतून या दैवी स्थानाचे दिव्य दर्शन घडवत आहे, असे मला वाटले.

३. मी नामजप करतांना थोडी झुकले असता माझ्या समवेत श्रीकृष्णही झुकून माझा आतून चाललेला नामजप ऐकत आहे, असे मला जाणवले.

४. मला स्वतःमध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व जवळजवळ १५ मिनिटांपर्यंत जाणवत होते.

५. त्या वेळी पूर्ण वेळ माझा नामजप उच्च प्रतीची शांतता, स्थिरता आणि एकाग्रता यांसहित होत होता आणि तो आपोआपच श्‍वासाला जोडून होत होता.

माझ्याकडून पुष्कळ नामजप आणि उपाय व्हावेत, यासाठी श्रीकृष्णाने मला ही अनुभूती दिली असावी, असे मला वाटले. त्यासाठी मी त्याची अंतःकरणपूर्वक कृतज्ञ आहे.

– कु. अ‍ॅना ल्यु (२८.१२.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक