संतांचे आज्ञापालन करण्याविषयी अमेरिकेतील ६४ टक्के  आध्यात्मिक पातळीचे श्री. सोमनाथ परमशेट्टी यांना आलेली अनुभूती !

श्री. सोमनाथ परमशेट्टी

१. पू. (सौ.) योयाताई यांनी सांगितल्यानुसार आध्यात्मिक उपाय होण्यासाठी निर्माल्यातील एक लहान फूल डोक्यावर ठेवणे : ५.१.२०१७ या दिवशी मी सकाळच्या अल्पाहाराच्या वेळी पू. (सौ.) योयाताईंच्या शेजारी बसलो होतो. तेथे आश्रमातील साधकांवर आध्यात्मिक उपाय व्हावेत, यासाठी एका पटलावर निर्माल्यातील फुले ठेवली होती. पू. (सौ.) योयाताईंनी त्यातील एक छोटे फूल मला माझ्या डोक्यावर (सहस्रारचक्रावर) ठेवण्यास सुचवले. त्यावर मी त्यांना म्हणालो, माझे केस लहान असल्यामुळे तेे फूल पडून जाईल.  तेव्हा त्यांनी सांगितले, त्या फुलामुळे तुमच्यावर उपाय होतील.

२. डोक्यावरील फुलामुळे दिवसभर उपाय होत असल्याचे जाणवणे आणि संतांच्या आज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येऊन स्वतःच्या बुद्धीच्या अडथळ्याची जाणीव होणे : संतांचे आज्ञापालन करायला हवे, असा विचार करून मी निर्माल्यातील एक छोटे फूल माझ्या डोक्यावर ठेवले. त्या क्षणी माझ्यावर उपाय होऊ लागले आणि माझ्या तोंडवळ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत असल्याचे मला जाणवले. दिवसभर माझ्या डोक्यावरून ते फूल खाली पडले नाही. शिबिराच्या सत्रांच्या कालावधीतही माझ्यावर उपाय होत असल्याचे मला जाणवत होते. या अनुभूतीमुळे संतांच्या आज्ञापालनाचे महत्त्व माझ्या लक्षात आले आणि बुद्धीच्या अडथळ्यामुळे आपण चैतन्याचा लाभ घेण्यापासून कसे वंचित राहू शकतो, याविषयी जाणीवही झाली.

मला ही अनुभूती दिल्याबद्दल आणि साधनेत येणार्‍या बुद्धीच्या अडथळ्याची जाणीव करून दिल्याबद्दल मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. सोमनाथ परमशेट्टी, अमेरिका (५.१.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक