ब्रिटनच्या दौर्‍यात हाफिज सईदने मुसलमानांना जिहादसाठी चिथावणी दिल्याचे उघड

जगभराची डोकेदुखी ठरलेला जिहादी आतंकवाद !

बर्मिंगहॅम येथील भाषणात केली होती हिंदूविरोधी गरळओक

लंडन – मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हाफिज सईद याने वर्ष १९९५ मध्ये ब्रिटनमधील दौर्‍यात तेथील मुसलमानांना जिहादी बनण्यासाठी चिथावणी दिली होती, अशी माहिती ‘बी.बी.सी. रेडिओ ४’ च्या ‘द डॉन ऑफ ब्रिटीश जिहाद’ या लघुपटात देण्यात आली आहे.

यातील माहितीनुसार, हाफिज सईदने वर्ष १९९५ मध्ये ब्रिटनमधील मशिदींना भेटी दिल्याचे लष्कर-ए-तोयबाच्या नियतकालिकातील छायाचित्रांवरून स्पष्ट होते. या दौर्‍यात त्याने बर्मिंगहॅम येथे बोलतांना हिंदूंचा निषेध करून मुसलमानांना जिहादसाठी संघटित होण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी लिसेस्टरशायर येथे त्याने घेतलेल्या मेळाव्यात ४ सहस्र युवक उपस्थित होते.

हा लघुपट नुकताच दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या निर्मात्यांपैकी एक असलेले सादिक इक्बाल यांनी सांगितले की, तेथील प्रत्येक कार्यक्रमात सईद जिहादविषयी बोलतांना दिसत आहे. ग्लासगो येथे सईद याने एका मशिदीत सभा घेतली होती. तेथे त्याने यहुदी लोक जिहादच्या विरोधात अब्जावधी डॉलर्स वापरत असल्याचे सांगितले होते. मुसलमानांना आर्थिकदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याचाही त्यांचा मानस आहे, असा आरोपही त्याने केला होता. ग्लासगो मशिदीने सईदसारख्या आतंकवाद्याला उघडपणे प्रवेश दिल्याची गोष्टच धक्कादायक आहे; कारण ती मशीद देवबंदची होती. वर्ष १९९५ मध्ये सईद हा काश्मीरमधील सक्रीय आतंकवादी होता. या सर्वांवर ग्लासगो मशिदीने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने मार्च २००१ मध्ये हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now