काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत ! – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

अशी देशद्रोही विधाने करणारे आमदार असलेल्या पीडीपीवर सरकार बंदी घालणार का ?

पीडीपीचे खरे स्वरूप आता लक्षात आल्यावर त्यांच्याशी युती करणारा भाजप आता काय करणार आहे ?

श्रीनगर – काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले. मीर पुढे म्हणाले, “आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झालेले अनेक जण अल्पवयीन आहेत. आपण काय करत आहोत, हे त्यांना समजत नसते. त्यांच्या मृत्यूनंतर जल्लोष करू नये. ते काश्मीरचे रहिवासीच आहेत.” मीर यांच्या या वक्तव्याला भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ‘आतंकवादी आणि फुटीरतावादी हे काश्मीर, काश्मिरी नागरिक, तसेच येथील शांतता आणि विकास यांचे शत्रू आहेत. त्यामुळे ते कुणाचेही भाऊ होऊ शकत नाहीत’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF