ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडन दौर्‍यावर गेलेल्या वरिष्ठ पत्रकारांनी उपाहारगृहामधील चांदीचे चमचे चोरले

गुन्हा मान्य न करणार्‍या पत्रकारास ५० पौंडांचा दंड

  • असे पत्रकार उद्या शत्रूराष्ट्राच्या मोहाला बळी पडल्यास आश्‍चर्य वाटू नये ! असे पत्रकार कशा प्रकारे पत्रकारिता करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
  • पत्रकारांवरील कथित अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकारांच्या संघटना देशाची अपकीर्ती करणार्‍या अशा पत्रकारांचा किमान निषेध तरी करणार का ?

कोलकाता – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत लंडनच्या दौर्‍यावर गेलेल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी एका उपाहारगृहामध्ये चांदीचे चमचे चोरल्याची धक्कादायक घटना उघड झाली. त्या उपाहारगृहामधील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यामुळे ही पत्रकारांची चोरी पकडली गेली. हा भोजन समारंभ एका विदेशी शिष्टमंडळासमवेत होता. यास भारत आणि ब्रिटन यांच्यातील महत्त्वपूर्ण राजकीय नेते, उद्योगपती आणि पत्रकार उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांच्या परदेश दौर्‍याच्या वेळी त्यांच्यासमवेत गेलेल्या पत्रकारांच्या चमूमध्ये अनेक जण संपादक आहेत. हे सर्व जण जेवणासाठी एका उपाहारगृहामध्ये गेले असता त्यांना तेथील चांदीचे चमचे पाहून मोह आवरला नाही. बंगाली भाषेतून निघणार्‍या एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने सर्वांत आधी एक चमचा चोरला. त्यानंतर बहुतेक सर्वच पत्रकारांनी चमचे चोरून आपापल्या बॅगेत ठेवले. त्यानंतर जेवण आटोपून सर्व पत्रकार निघाले असता तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. या पत्रकारांनी चमचे चोरल्याचे आधीच सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले होते. त्याविषयी सुरक्षारक्षकांनी पत्रकारांकडे विचारणा केल्यावर कुणीही खरे बोलण्यास सिद्ध झाले नाही. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांनी झडती घेतल्यानंतर त्यांना चोरलेले चमचे परत करावे लागले.

एका पत्रकाराला ५० पौंडांचा (अनुमाने ४ सहस्र ३०० रुपये) दंड !

त्यातील एक पत्रकार मात्र त्याने चमचा चोरला नसल्याचाच दावा करत होता. वास्तविक या पत्रकाराने चमचा चोरून तो अन्य एका पत्रकाराच्या बॅगेत ठेवला होता.

त्याचे हे कृत्य सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात कैद झाले होते. शेवटी हॉटेल व्यवस्थापनाने या प्रकाराची पोलीस तक्रार करण्याची चेतावणी दिल्यानंतर भयभीत होऊन त्याने चोरी केल्याचे मान्य केले. या गुन्ह्यासाठी सदर पत्रकाराला ५० पौंडांचा (अनुमाने ४ सहस्र ३०० रुपये) दंड भरावा लागला. या चोरट्या पत्रकारांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now