‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणार्‍यांची चौकशी करा !’

अमरावती येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

अमरावती – कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव नाहक गोवले गेले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणासमवेत काहीच संबंध नाही. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून देव, देश आणि धर्म यांसाठी युवकांच्या मनामध्ये जागृती अन् भक्ती निर्माण करण्याचे कार्य करते. असे धर्मकार्य करणार्‍या गुरुजींवर अशा प्रकारचे आरोप केले जातात, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. शासनाने याची वेळीच नोंद घेऊन अशा प्रकारचे गुन्हे प्रविष्ट करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे येथील हिंदुत्वनिष्ठांनी केली. हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे यांना देण्यात आले.

या वेळी शिवसेना महिला सहसंपर्क प्रमुख सौ. कांचन ठाकुर, शिवसेना शहरप्रमुख श्री नरेंद्र केवले, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. जय देशमुख, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे अमरावती कार्यवाहक श्री. महेश लढके, श्री. अभिषेक दिक्षीत, श्री. चंदन तिवारी यांसह एकूण ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now