पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

‘निराधार आरोप’, हे पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे (डावीकडे) यांना निवेदन देतांना धारकरी

पुणे, ७ जानेवारी (वार्ता.) – १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली येथे गडकोट मोहिमेच्या नियोजनात व्यस्त होते. त्यांच्यावर झालेले आरोप हे पूर्णतः निराधार, तसेच एका पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग आहेत. भिडेगुरुजी यांच्याप्रमाणेच श्री. मिलिंद एकबोटे हेही निष्ठेने हिंदुत्व अन् गोरक्षण यांचे कार्य करत आहेत. पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली. ५ जानेवारीला उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना त्याविषयीचे निवेदनही देण्यात आले. धारकरी, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now