पू. भिडेगुरुजींच्या समर्थनासाठी कराड आणि वाई येथे सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

कराड येथील मोर्च्यात सहभागी झालेले हिंदू

कराड (जिल्हा सातारा), ५ जानेवारी (वार्ता.) – येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ दत्त चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहस्रावधी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पू. भिडेगुरुजी यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्यामागे कोणाचे षड्यंत्र आहे, याचा शासनाने छडा लावावा, तसेच प्रकाश आंबेडकर आणि नक्षलवादी यांच्यातील संबंधांची शासनाने चौकशी करावी, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आले.

या वेळी धारकरी सर्वश्री सागर आमले, रवींद्र डोंबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश कापसे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ रैनाक, हिंदु एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष राहुल यादव, रूपेश मुळे, विष्णु पाटसकर, सौ. मेघा माने-जाधव, हिंदु जनजागृती समितीचे मदन सावंत यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

वाई येथेही मोर्चा

वाई (जिल्हा सातारा) – पू. भिडेगुरुजींच्या समर्थनार्थ येथे निघालेल्या मोर्च्यात शेकडो हिंदू भगवा ध्वज आणि निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि प्रतापगड उत्सव समिती यांच्या वतीने प्रांताधिकारी सौ. अस्मिता मोरे आणि विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धारकरी सर्वश्री संदीप जायगुडे, काशीनाथ शेलार, संतोष काळे, संदीप साळुंखे, गणेश कीर्दत, किशोर भोसले प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, शिवसेनेचे गणेश जाधव सहभागी झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now