तीन तलाकच्या विरोधातील विधेयकाच्या वेळी महाराष्ट्रातील भाजपच्या ३ महिला खासदार अनुपस्थित

विधेयक सादर करतांना सभागृहात उपस्थित रहाण्याचा पक्षादेश धुडकावला !

नवी देहली – लोकसभेत नुकत्याच पारित करण्यात आलेल्या तीन तलाकच्या विरोधातील विधेयकाच्या संमतीच्या वेळी महाराष्ट्र्रातील भाजपच्या खासदार पूनम महाजन, प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या अनुपस्थित होत्या. त्याचप्रमाणे यानंतर मुख्यमंत्र्यांसह पार पडलेल्या भोजनाच्या कार्यक्रमालाही त्या अनुपस्थित होत्या. ‘तीन तलाकविषयीचे विधेयक सादर करण्याच्या दिवशी पक्षाच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित रहावे’, असा पक्षादेश (व्हिप) भाजपने काढला होता. याशिवाय भाजपचे लोकसभेतील पक्षप्रतोद राकेश सिंह यांनीही पक्षातील सर्व खासदारांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांना संसदेत उपस्थित रहाण्याची सूचना केली होती. त्यामुळे सर्व खासदारांना संसदेत उपस्थित रहाणे बंधनकारक होते. तरीही वरील ३ महिला खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय क्षेत्रात याविषयी सर्वत्र चर्चा चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF