कोरेगाव भीमा येथे पेशवाईच्या कथित पाडावाचा विजयोत्सव साजरा करण्यास कॅप्टन जमादार यांचा आक्षेप

पुणे, ३१ डिसेंबर (वार्ता.) – कोरेगाव भीमा येथे पेशवाईच्या कथित पाडावाचा काही ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींकडून १ जानेवारीला विजयदिवस साजरा केला जातो. कॅप्टन बाळासाहेब जमादार यांनी त्यास कायदेशीर विरोध करून विजयोत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांनी पोलीस प्रशासनाकडेही या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा येथील भूमी ही स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा करत जमादार यांनी त्यांच्या वहिवाटेत प्रतिवर्षी विजयोत्सवाच्या नावाखाली येणार्‍यांवर आक्षेप घेतला आहे. ‘या प्रकरणी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २० डिसेंबर या दिवशी या जागेवर १ मास (महिना) ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. तरीही त्या भूमीत कार्यक्रम घेतला गेला, तर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी आयोजक, तसेच जिल्हा प्रशासन यांच्याविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात येईल’, असे श्री. जमादार यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF