स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !

नामजप करत असतांना देवाने साधकाला सेवेविषयी सुचवलेला विचार !

श्री. राहुल कदम

२६.४.२०२६ या दिवशी नामजप करत असतांना देवाने मला सेवेविषयी पुढील विचार सुचवले, ‘ज्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन झाल्यानंतर मी समाजात परिवर्तन करीन’, हा विचार अयोग्य आहे, त्याप्रमाणेच ‘समाजात परिवर्तन झाल्यावर मी स्वतःमध्ये परिवर्तन करीन’, हाही विचार अयोग्य आहे. स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत.’

श्री गुरुकृपेने मला हे विचार सुचले. ही विचारसुमने मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी भक्तीभावाने अर्पण करत आहे. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली. (३०.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक