कर्नाटकातील सध्याच्या घडामोडी पहाता कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारचा प्रत्येक निर्णय हिंदूंना हादरवून सोडणारा आहे; पण दुर्दैवाचे, म्हणजे हिंदूंनीच काँग्रेसला निवडून दिले आहे, त्यामुळे ‘करावे तसे भरावे’, या म्हणीप्रमाणे हिंदूंनाच भोगावे लागत आहे. ही स्थिती हिंदूच पालटू शकतात; पण ते तसे करणार नाहीत, हेही तितकेच सत्य आहे; कारण हिंदूंना सर्वकाही विनामूल्य हवे आहे, धर्म-राष्ट्राविषयी अजिबात श्रद्धा नाही, ज्यांची खरोखरच श्रद्धा आहे, अशा राष्ट्र आणि धर्म प्रेमींना अपरिमित वेदना सहन कराव्या लागत आहेत. ही झाली सर्वसामान्यांची व्यथा, मग पोलिसांची व्यथा ती काय ? ते त्यांचे कर्तव्य स्वतःच मर्यादित करत आहेत कि राज्याची काळजी सोडून स्वतःच्या काळजीचा विचार करत आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो. सीमेवर सैनिक देशासाठी परकीय शक्तींशी लढत आहेत, त्यांचेच एक रूप सैनिकांप्रमाणेच पोलिसांच्या गणवेशात देशातील राज्यांमध्ये कर्तव्य बजावत आहे. सैनिक आणि पोलीस यांच्यामधील समानता, म्हणजे अन्याय किंवा चुकीच्या विरुद्ध लढून लोकांना न्याय मिळवून देणे; पण इथेच त्या दोघांमध्ये भेद आहे. ‘भारतीय वीर सैनिक सीमा ओलांडून शत्रूंना धूळ चारतात; पण राज्याचे पोलीस त्यांच्या सीमा (मर्यादा) स्वतःच न्यून करून समाधान मानतात’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

१. पोलिसांकडे बंदूक असूनही धर्मांध मुसलमानांकडून मार खाण्याच्या घटना
अ. ११ ऑगस्ट २०२० : आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुकवर प्रेषित महंमद यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केले. या कारणावरून सहस्रो लोकांच्या जमावाने रात्रीच्या वेळी डी.जे.हळ्ळी आणि के.जी.हळ्ळी पोलीस ठाण्यांवर आक्रमण केले. पोलीस ठाणे, आमदारांचे घर आणि पोलीस वाहने यांना आग लावून पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.
आ. १६ एप्रिल २०२२ : मशिदीवर भगवा ध्वज फडकावल्यासारखे छायाचित्र छेडछाड केलेले चित्र ‘व्हॉट्सॲप स्टेटस’वर ठेवल्याचा निषेध करत जुने हुब्बळ्ळी पोलीस ठाण्यासमोर रात्री सहस्रो लोक जमा झाले होते. हा जमाव अचानक हिंसक झाला आणि त्याने पोलीस ठाणे, रुग्णालय, वाहने आणि पोलीस यांवर दगडफेक केली.
इ. १ ऑक्टोबर २०२३ : ‘ईद ए मिलाद’ मिरवणुकीच्या वेळी लावण्यात आलेल्या एका ‘कटआऊट’च्या (छायाचित्राविषयीचा एक फलक) वादाच्या संदर्भात शिवमोग्गाच्या रागीगुड्डा भागात मिरवणूक चालू असतांना अचानक दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
ई. १० फेब्रुवारी २०२५ : समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह आणि जातीय प्रक्षोभक लिखाण प्रसारित केल्याच्या आरोपाखाली पांडुरंग नावाच्या व्यक्तीला मैसूरूच्या उदयगिरी पोलिसांनी कह्यात घेतले होते. ही माहिती मिळताच अल्पसंख्यांक समुदायाच्या एका मोठ्या जमावाने पोलीस ठाण्यासमोर जमून आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. जमावाला शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी होऊन जमावाने अचानक ठाणे आणि पोलीस वाहन यांवर जोरदार दगडफेक केली.
उ. १९ फेब्रुवारी २०२६ : बागलकोटेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना अचानक दगडफेक झाली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांवरही दगड पडले. ‘क्लोज सर्किट टीव्ही फुटेज’च्या आधारे पोलिसांनी ८ जणांना कह्यात घेऊन शहरात जमावबंदीविषयीचे कलम १४४ लागू केले.
ऊ. २४ मे २०२६ : उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ (एन्.एच्. ६६) पूर्वी हटवण्यात आलेल्या एका हिंदु धार्मिक कट्ट्याची (देवाचा कट्टा) पुनर्बांधणी करण्याच्या सूत्रावरून दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या बांधकामाला स्थानिक मुसलमानांनी आक्षेप घेतला होता. त्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती.

२. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मार खाणे, हे कितपत योग्य ?
वरील उल्लेख केलेल्या घटना या सर्व अधिकृतपणे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. याखेरीज असे कितीतरी अहवाल असतील, जे नोंदवले गेलेले नसतील आणि उघडकीस आलेही नसतील. एकूण घटना पहाता सशस्त्र पोलिसांनी मार खाणे, हे दुर्दैवी आहे. पोलीस अशा प्रकारे अजून किती दिवस असा मार खाऊन खाकी पोशाखाला कलंक लावणार आहेत ?पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मार खाणे, हे कितपत योग्य ? खरेतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना समजेल, अशा भाषेत किंवा त्यांनी अवलंबलेल्या मार्गाने योग्य कठोर कारवाई केली, तरच कायदा-सुव्यवस्था राखणे शक्य होईल अन् पोलिसांवर हात उचलण्यापूर्वी धर्मांध वा गुन्हेगार १०० वेळा विचार करील. पोलिसांनी अशा प्रकारे स्वतःचा वचक निर्माण केल्यास निम्म्याहून अधिक दंगली आपोआपच थांबतील. दंगल करण्यापूर्वी दंगलखोर १०० वेळा विचार करतील; पण पोलिसांनी तसे न केल्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयीची भीती राहिलेली नाही, हेसुद्धा तितकेच सत्य आहे.
३. पोलिसांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले, तर समाजकंटक कायमच शांत रहातील !
हे सर्व पहाता पोलिसांनो, तुम्हाला स्वतःच्या जिवाची पर्वा नसली, तरी खाकीचा सन्मान राखण्यासाठी का होईना, समाजकंटकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करा. साम, दाम, दंड यांचा वापर पूर्वी केला जात असे; पण काळ पालटला आहे, हे पोलिसांवर होणार्या आक्रमणांच्या घटनांवरून स्पष्ट होते. त्यामुळे काळानुसार पोलिसांनी दंडाचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी. एखाद्या धर्मांधाचा वा गुन्हेगाराचा खरपूस समाचार घेतला, तरी त्याचे अन्य साथीदार सैरावैरा पळत सुटतील. जर पोलिसांनी निष्क्रीयता दाखवली आणि धर्मांधांपैकी एकाने जरी तुमच्यावर दगडफेक केली, तरी बाकीचे साथीदार ती निष्क्रीयता पाहून दगडफेक करतात. त्यामुळे इथून पुढे तरी कायदा-सुव्यवस्थेसाठी दंडाचा वापर करा. त्यामुळे खाकीवरील लोकांचा अविश्वास दूर होईल आणि खर्या अर्थाने लोकांसाठी तुम्हीच आधार म्हणून पाठीराखे व्हाल. असे झाले, तरच लोक तुमच्या साहाय्यासाठी धावून येतील. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ याप्रमाणे तुम्ही धर्मासाठी, म्हणजेच तुमच्या पोलीस कर्तव्यासाठी सज्ज झाला, तर धर्म, म्हणजेच सज्जन लोक तुमच्या साहाय्यासाठी उभे रहातील. यासह तुम्ही जर साधना चालू केली, तर भगवंताचे संरक्षककवच तुमच्या सभोवताली असेल. त्यामुळे पोलिसांनो, तुम्ही साधनासुद्धा करा !
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२६)
‘ऑनलाईन’ गुन्हेगारांच्या टोळ्या !
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !