मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी ठरवल्यास मलंगगडमुक्तीचा प्रश्न एक मिनिटात निकाली निघेल ! - रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप

डोंबिवली – मलंगगडासह अन्य मंदिरांविषयी केलेल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री म्हणून नक्कीच पूर्ण करीन. एक काळ असा होता, जेव्हा पोलीस आणि गुंड पिंपळेश्वर मंदिराची जागा हडपण्यासाठी एकत्र आले होते; परंतु अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही महादेवाचे खरे भक्त सर्वांना पुरून उरले. भक्तांच्या अभेद्य शक्तीमुळेच ही पवित्र जागा वाचली, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील श्री पिंपळेश्वर मंदिराच्या जागेसंदर्भात राज्यशासनाच्या निर्णयानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि इतर प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,‘‘पिंपळेश्वर मंदिर परिसरातील भूमीचे नियंत्रण मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. पिंपळेश्वर मंदिरच नव्हे, तर अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर आणि खिडकाळी येथील महादेव मंदिर या सर्व देवस्थानांना ट्रस्टच्या माध्यमातून अधिकाधिक विकास करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे. मलंगगडाच्या प्रश्नात राज्यशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तो सोडवावा.’’
संपूर्ण ठाणे जिल्हा हिंदुत्वनिष्ठ विचारांचा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मलंगगडाचा विषय सुटलाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजकीय सामर्थ्य आहे. त्यांनी ठरवले, तर वर्षानुवर्षे रखडलेला मलंगगडाचा प्रश्न अवघ्या एका मिनिटात निकाली निघेल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वेळी केले.
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
सिंहस्थ कुंभपर्वाची कामे वेळेत पूर्ण करावीत !
मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन