Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !

टाटा आस्थापन आघाडीवर !

नवी देहली – पेट्रोल आणि डिझेल यांवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात केले होते. या आवाहनाचा परिणाम दिसून आला आहे. सरकारच्या ‘वाहन’  पोर्टलवरील नोंदणी आकडेवारीनुसार, मे महिन्यात प्रवासी इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत  मागील वर्षाच्या तुलनेत ८०.७ टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात टाटा आस्थापन आघाडीवर आहे. यासह महिंद्रा, एम्जी, मारुती सुझुकी आणि विनफास्ट इत्यादी आस्थापनांच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्येही वाढ झाली आहे.

एका अहवालानुसार, मे २०२६ मध्ये देशात एकूण २५ सहस्र ८८० इलेक्ट्रिक कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात (मे २०२५) ही संख्या केवळ १४ सहस्र ३२३ इतकी होती.