३ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले
६० लाख रुपये उकळले
धर्मांतरासाठी टाकला दबाव
(मॉडेल म्हणजे कपडे, दागिने किंवा इतर उत्पादनांचे विज्ञापन करण्यासाठी ते परिधान करणारी किंवा प्रदर्शित करणारी व्यक्ती )

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील एका हिंदु मॉडेलने महंमद वसीम आणि त्याचे कुटुंबीय यांच्याविरुद्ध १० ते ११ वर्षांच्या कालावधीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित हिंदु तरुणीने सांगितले की, तिच्यावर ‘निकाह’ (इस्लामी पद्धतीने विवाह) करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. तिच्या तक्रारीनंतर मेरठ पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
१. पीडित हिंदु तरुणी मेरठमधील सरधना येथील रहिवासी आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये देहली आणि मुंबई येथे मॉडेल म्हणून काम करत असतांना तिची भेट वसीमशी झाली. वसीमने तिला चित्रपट अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.
२. पीडितेचा आरोप आहे की, ती ३ वेळा गर्भवती राहिली होती; परंतु वसीमने तिला बलपूर्वक गर्भपात करण्यास भाग पाडले होते. तसेच धर्मांतर करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला होता.
३. आरोपीने तिची कारकीर्द (करिअर) घडवण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन देऊन तिचे आर्थिक शोषणही केले. त्याने तिच्याकडून अनुमाने ५० ते ६० लाख रुपये उकळले. पीडितेने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती