संस्कृत भाषेतील जाणकारांनी संस्कृत श्‍लोक, मंत्र आणि सुभाषिते पडताळण्याची सेवा करून ग्रंथसेवेत हातभार लावावा !

साधक आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !

१. संस्कृत भाषेचे माहात्म्य आणि सनातन संस्थेने विविध लिखाणांत संस्कृत श्‍लोकांचा अंतर्भाव करण्यामागील कारण

संस्कृत ही देवभाषा असून सर्व भाषांची जननी मानली जाते. ती अतिशय अर्थपूर्ण आणि चैतन्यदायी भाषा आहे. संस्कृत सुभाषिते आणि श्‍लोक हे या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. संस्कृतमधील सुभाषिते आणि श्‍लोक न्यूनतम शब्दांत एखाद्या विषयाचा अर्थपूर्ण आशय सांगून जातात.

सनातनने विविध भाषांमधील शेकडो ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांतील प्रकरणांमध्ये, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांतील लेखांमध्ये आवश्यकतेनुसार संस्कृत श्‍लोक, सुभाषिते अन् मंत्र त्यांच्या अर्थासह अंतर्भूत केले जातात. बहुतांश संस्कृत श्‍लोकांना पौराणिक आणि धर्मशास्त्र विषयीच्या ग्रंथांचा संदर्भ असतो. या श्‍लोकांमुळे ग्रंथ आणि नियतकालिक यांतील लिखाणालाही धर्मग्रंथांचा आधार प्राप्त होतो अन् ते परिणामकारक होते.

२. संस्कृत श्‍लोक पडताळण्यासाठी संस्कृततज्ञांची आवश्यकता !

ग्रंथ आणि नियतकालिक यांत प्रसिद्ध केले जाणारे सर्व श्‍लोक संस्कृतदृष्ट्या शुद्ध असणे आवश्यक असल्याने प्रसिद्धीपूर्वी ते पडताळले जातात. या सेवेसाठी संगणकीय ज्ञान असलेल्या संस्कृततज्ञांची आवश्यकता आहे. श्‍लोक आणि सुभाषिते पडताळणे, त्यांचा संदर्भ लिहिणे, तसेच त्यांचा अर्थ लिहिणे, असे सेवेचे स्वरूप असून संस्कृततज्ञ या सेवेेत सहभागी होऊ शकतात. काही दिवस आश्रमात राहून सेवेविषयी अवगत करून घेतल्यास नंतर घरी राहून ही सेवा करता येईल.

इच्छुकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार स्वतःची माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी. यात काही शंका असल्यास ७९७७११३७७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

(टपालासाठी पत्ता : श्री. रोहित साळुंके, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.)

संस्कृत भाषा म्हणजे हिंदूंच्या समृद्ध आणि गौरवशाली संस्कृतीचे प्रतीक ! सनातनचे ग्रंथ आणि नियतकालिके यांत प्रसिद्ध करण्यासाठी संस्कृत श्‍लोक पडताळण्याची सेवा करणे, म्हणजे एकप्रकारे हिंदु संस्कृतीचे जतन करण्याच्या कार्यात हातभार लावण्यासारखेच आहे !


Multi Language |Offline reading | PDF