केरळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा, या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एर्नाकुलम् – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर युगादीला साजरे करा, या मोहिमेला हिंदूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नववर्षाविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एर्नाकुलम् येथील श्री हनुमान मंदिराच्या आवारात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. हिंदु धर्मानुसार नववर्ष युगादीला (गुढीपाडवा) साजरे करतात. १ जानेवारीला नववर्ष साजरे करण्याला कुठलाच आध्यात्मिक किंवा इतर आधार नाही. या दिवशी केवळ दारू पिणे, अमली पदार्थांच्या आहारी जाणे, मेजवान्या, अपघात आणि इतर आघात पहायला मिळतात.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी फलकांच्या माध्यमातून हिंदु नववर्षाचे महत्त्व लोकांच्या लक्षात आणून दिले. तेथेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. भाविकांनी त्याचाही लाभ घेतला.


Multi Language |Offline reading | PDF