वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाचे नाव पालटणार !

चित्रपटाला ‘पद्मावती’ ऐवजी ‘पद्मावत’ नाव देण्याची सूचना

‘घूमर’ नृत्यालाही कात्री लागणार

याचा अर्थ चित्रपटात इतिहासाशी मोडतोड केली नसल्याचा भन्साळी यांचा दावा खोटा होता, हेच स्पष्ट होते ! असत्य अणि भावना दुखावणारी दृश्ये प्रसारित करणार्‍या भन्साळी यांच्यावर सरकार काय कारवाई करणार ? कि त्यांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करणार ?

नवी देहली – दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाचे नाव पालटून ते ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) ६ सदस्यांच्या समितीने निर्मात्यांना केली. या समितीत इतिहासतज्ञ, तसेच काही राजघराण्यांतील व्यक्ती यांचाही समावेश होता.

या समितीने केलेल्या अन्य सूचना

१. या चित्रपटातील चर्चेचा विषय ठरलेल्या ‘घूमर’ या नृत्यात काही पालट करण्यात यावेत.

२. समितीच्या निर्णयानुसार या चित्रपटाला ‘ए/यू’ प्रमाणपत्र देण्यात येईल.

३. चित्रपटाच्या आरंभी पडद्यावर ‘हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून तो काल्पनिक चित्रपट आहे’, अशी ठळक सूचना (डिस्क्लेमर) प्रसिद्ध करावी.

मुख्य म्हणजे या चित्रपटातील २६ दृश्यांवर कात्री लावण्याचा निर्णय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने घेतला आहे. समितीने सुचवलेले हे पालट अमलात आणल्यानंतरच चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून या चित्रपटाला प्रमाणित करणार येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. यावर भन्साळी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF