कमला मिल आग प्रकरणी ३ आरोपींच्या विरोधात लूकआऊट नोटीस

मुंबई – कमला मिलमधील ‘मोजोस् बिस्रो’ आणि ‘१ अबव्ह’ या उपाहारगृहांना २८ डिसेंबरच्या रात्री लागलेल्या आगीत होरपळून १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ३ आरोपींना लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ पथके सिद्ध केली आहेत.

या दुर्घटनेनंतर महापालिकेने कमला मिल आणि रघुवंशी मिल मधील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. मुंबई महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील ४ अनधिकृत उपाहारगृहे तोडली आहेत. (ही कारवाई पूर्वीच झाली असती, तर निष्पाप लोकांचे प्राण वाचले असते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF