धुळे येथील धर्मजागृती सभेला लोटला २२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनसागर !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समर्पित होण्याची वक्ते आणि श्रोते यांची ललकारी !

धुळे – येथे २५ डिसेंबरला अपूर्व उत्साहात आणि २२ सहस्रांहून अधिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेसाठी जनसामान्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वजण एक हिंदू म्हणून उपस्थित होते. सर्व वक्त्यांची क्षात्रतेजयुक्त भाषणे आणि उपस्थित हिंदूंनी दिलेल्या वीरश्रीयुक्त घोषणा यांमुळे संपूर्ण वातावरण भारीत झाले होते. याच सळसळत्या उत्साहात वक्ते आणि श्रोते यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची ललकारी दिली…‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’

तळमळीने सेवा करून धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करणारे साधक आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

‘धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभेला २२ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीविषयी हिंदूंच्या मनात विश्‍वास वाढत असल्याचे द्योतक आहे. आताचा काळ हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी पूरक आहे. धुळ्यात समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांची संख्या अल्प असूनही या सर्वांनी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. त्यामुळे सभेला हिंदूंचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी सर्व कार्यकर्ते आणि साधक यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्वत्रचे साधक आणि कार्यकर्ते यांनी हा आदर्श घ्यावा.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समितीने धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन निर्माण केले ! – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे आयोजित करण्यात आलेली हिंदु धर्मजागृती सभा अतिशय चांगली झाली. समितीने सभेच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन धुळे येथे निर्माण केलेे. मी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असतांनाही या सभेला स्वतः उपस्थित राहून तुमच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो. सभेचे नियोजन चांगल्या प्रकारे आणि शिस्तबद्धरित्या करण्यात आले होते. समितीच्या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा !

शेकडो धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रार्थनेमुळे सभा निर्विघ्नपणे पार पडली !

सभेच्या ५ दिवस अगोदर झालेल्या दंगलीनंतर धर्मप्रेमींनी देवाला प्रार्थना केल्या !

धुळे शहरात २० डिसेंबरला एका भागात दगडफेक होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या सर्व घटनांमुळे सभा रहित व्हायला नको; म्हणून त्यांनी स्वतः जशी येईल त्या भाषेत देवाला प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. येथील नवनाथ मंदिरात स्थानिक युवकांनी ‘सभा व्यवस्थित पार पडू दे’, अशी प्रार्थना केली.

नेहमीप्रमाणे धुळे दंगलीनंतर संचारबंदी लागू झालीच नाही !

सभेनंतर एका उद्योजकाची भेट घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘धुळ्यात दगडफेक झाल्यावर २-३ दिवसांची संचारबंदी लागू केली जाते; पण या वेळी का लागला नाही, असा प्रश्‍न मला पडला. नंतर कळले की, येथे हिंदु धर्मजागृती सभा आहे ! तुमचे कार्य ईश्‍वरी आहे.’’

धुळ्यातील शेकडो धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेल्या प्रार्थना आणि धुळ्याचे ग्रामदैवत एकवीरादेवी हिचा कृपाशीर्वाद यांमुळेच सभा निर्विघ्नपणे पार पडली. – (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव, जळगाव

हिदु धर्मजागृती सभेमधील वक्त्यांचे जाज्वल्य मार्गदर्शन…

अशी झाली धर्मसभा…!

ऐतिहासिक सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, या जयघोषात आमदार श्री. टी. राजासिंह यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती सर्वश्री प्रमोद लक्ष्मण वैद्यगुरुजी, निखील प्रमोद वैद्य, प्रसाद दामोदर कुलकर्णी आणि भरत प्रसाद कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले.

धुळे जिल्ह्याची ग्रामदेवता श्री एकवीरादेवीचा आशीर्वाद घेऊन हिंदु धर्मजागृती सभेद्वारे प्रज्वलित झालेली हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्वाला धगधगत ठेवण्याचा दृढ निश्‍चय सहस्रावधींच्या संख्येने उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनी केला. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो’, अशा जयघोषांनी धर्मसभेचे वातावरण हिंदुत्वमय झाले. या वेळी समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा म्हणवून घेतली. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी मांडला, तर समितीचे श्री. सचिन वैद्य यांनी सभेला सहकार्य केलेल्या सर्व धर्मप्रेमी आणि दानशूर व्यक्तींचे आभार मानले.

सभेत श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष तथा भाग्यनगर (हैदराबाद) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी आपल्या जाज्वल्य वाणीने उपस्थितांमध्ये हिंदूसंघटन अन् धर्मरक्षण यांसाठी कटिबद्ध होण्याची स्फूर्ती दिली.

आतंकवाद आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – टी. राजासिंह

१. सध्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही मोठ्या प्रमाणावर गोहत्या केली जात आहे. नुकतेच सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे २५० बैल पकडण्यात आले. गोवंशियांची उघडपणे हत्या केली जात आहे. या विरोधात हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

२. जो गोहत्या करेल, त्याला योग्य त्या भाषेत धडा शिकवला पाहिजे. मग कोणाचीही गोहत्या करण्याची हिंमत होणार नाही.

३. सर्व हिंदूंनी येणार्‍या शिवजयंतीच्या एक मासापूर्वीच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तक्रार द्यावी. मग बघा काय होते ते !

४. धुळे येथे हिंदूंचे वास्तव्य असलेल्या गजानन कॉलनी आणि अन्य परिसर येथे धर्मांधांनी नियोजनबद्ध आक्रमण करून हिंदूंना तेथून पळवून लावले आणि तेथे स्वतःचे आधिपत्य निर्माण केले. ‘येथील धर्मांध आमच्यावर पुष्कळ अत्याचार करतात’, असे येथील हिंदू मला सभेपूर्वी सांगत होते. आता हे पालटले पाहिजे. तुम्ही काय पालट केला, हे मला सांगितले, तरच मी पुढच्या धर्मजागृती सभेला येईल. तुम्ही जर संघटित झाला नाहीत, तर तुमचे वाचणे कठीण आहे, हे लक्षात ठेवा.

५. आज सर्वांनी प्रतिज्ञा करा, ‘जो गोमांस भक्षण करतो, जो भारतमातेचा जयजयकार करत नाही, जो वन्दे मातरम् म्हणत नाही, जो लव्ह जिहाद करतो, अशा लोकांवर आम्ही आर्थिक बहिष्कार करू. त्यांच्याकडून काहीही खरेदी करणार नाही. त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही.’ मग बघा काय होते. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की, ते स्वतःहून तुमच्यासमोर झुकतील.

आमदार श्री. टी. राजासिंह म्हणाले की, मी प्रथम आमदार नसून मी प्रथम हिंदू आहे. मला धर्मासाठीच कार्य करायचे आहे. मला गोहत्या करणार्‍या, लव्ह जिहाद करणार्‍या, भारतमातेचा जयजयकार म्हणण्यास नकार देणार्‍या, वन्दे मातरम् म्हणण्यास नकार देणार्‍यांची मते नकोत. (बर्‍याचदा अनेक हिंदू नेते आणि लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यावर म्हणतात की, मी आता हिंदू नाही. मी प्रथम आमदार, खासदार, मंत्री आहे. त्यामुळे मला सर्वांचा विचार करायचा आहे. प्रत्यक्षात ते हिंदूंसाठी कार्यही करत नाही. दिलेली आश्‍वासने तर पाळतच नाही. याउलट आमदार श्री. टी. राजासिंह हे सातत्याने हिंदु धर्मरक्षणासाठी देशभर फिरून हिंदूंना जागृत आणि संघटित तर करतच आहे; पण स्वतःही गोरक्षण आणि अन्य धर्मरक्षणाची कृती करत आहे. यातून इतर हिंदू लोकप्रतिनिधींनी बोध घ्यावा ! – संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेला जाता येऊ नये, यासाठी दबाव टाकण्यात येऊन त्याला न जुमानणारे टी. राजासिंह !

मी सभेला येऊ नये; म्हणून माझ्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. विरोधाचे पुष्कळ प्रयत्न करण्यात आले; पण मी झुकलो नाही. ज्या ठिकाणी तणाव आहे. हिंदूंवर अन्याय होतो. तेथे मी कोणत्याही परिस्थितीत जातोच. तेथील परिस्थिती दोन्ही बाजूंनी सुस्थितीत आणल्याविना रहात नाही.

संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा नाहक छळ करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ? – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

१. मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह ९ हिंदुत्वनिष्ठांना कोणताही पुरावा नसतांना अटक केली होती. त्यांना विनाकारण ९ वर्षे कारागृहात सडवले गेले. ते आज जामिनावर मुक्त झाले आहेत. अशाच प्रकारे अनेक संतांवरही खोटे आरोप ठेवून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय्य कारवाई करणार्‍यांवर विद्यमान शासन कठोर कारवाई कधी करणार ?

२. सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी आणि हिंदूंना धर्मशिक्षण उपलब्ध करून देणारी संस्था आहे. सनातनचे आदर्श प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वासाठी प्राणार्पण करणारे संभाजी महाराज हे असून वर्ष २०२३ पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.

३. सध्या हिंदूंना धर्माचरण करण्यास लाज वाटते. पाश्‍च्यात्त्यांप्रमाणे इंग्रजी दिनांकानुसार मेणबत्त्या विझवून, केक कापून वाढदिवस साजरा करतात. त्याऐवजी हिंदु संस्कृतीनुसार जन्मतिथीला आरती ओवाळून वाढदिवस साजरा करायला हवा. आपल्या पाल्यांना कॉन्व्हेन्ट शाळांऐवजी मराठी शाळेत घालूया. साधना म्हणून कुलदेवतेचा नामजप करायला हवा.

वाढते धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

१. वर्ष २०१७ हे गुरु गोविंद सिंग यांच्या ३५१ व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांनी धर्मरक्षणासाठी प्राणांचे बलीदान दिले. त्यांच्या दोन लहान मुलांनीही वीरमरण पत्करले; मात्र धर्म पालटला नाही.

२. आज काही हिंदू प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. केवळ आदिवासी पाडे, ग्रामीण भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जाते, असे नाही, तर मुंबईतील डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेने ७०० जणांना प्रलोभन दाखवून धर्मांतर केले.

३. माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष २०१४ मध्ये ओडिशा आणि मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. त्यानुसार तातडीने राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू केला पाहिजे.

४. आपली संस्कृती विसरून ३१ डिसेंबरला नवे वर्ष साजरे करणे हेही एका दिवसाचे धर्मांतरच आहे. हिंदूंनी आपले नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे केले पाहिजे. यासाठी या सभेत आपण सर्वांनी ‘३१ डिसेंबरमुक्त धुळे’ ही संकल्पना राबवून स्वाभिमान जोपासूया’ असा सर्वांनी निश्‍चय करूया !

लव्ह जिहादच्या विरोधात देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा आदर्श ठेवून शौर्य गाजवले पाहिजे ! – सौ. क्षिप्रा जुवेकर

१. दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, चंडी, काली या हिंदु धर्मातील देवींचा आदर्श आपल्यासमोर असतांना हिंदू तरुणींनी अबला नव्हे, तर सबला बनून जिहादींचा सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे; कारण धर्मांधांकडून ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘फतवा जिहाद’, ‘फिल्म जिहाद’, ‘सेक्स जिहाद (जिहाद-अल्-निकाह)’ यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. यात लाखो हिंदू तरुणींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे.

२. नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५ सहस्रांंहून अधिक मुली या वर्षी बेपत्ता झाल्याची माहिती विधीमंडळाच्या अधिवेशनात दिली. या मुली नेमक्या गेल्या कुठे ? त्यांचे काय झाले असेल, याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

३. या विरोधात आता हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे शौर्य जागृत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लवकरच आपल्या परिसरात निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात येतील.

४. देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवण्याची भारतियांमध्ये न्यूनता नाही. जेव्हा बलोपासनेद्वारे हिंदू मावळे जागृत झाले, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली पाच पातशाह्या, म्हणजे आजचे ‘इस्लामिक स्टेट’ पायदळी तुडवत हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलाने फडकवला.

श्री. लक्ष्मीकांत जुगलकिशोर गिंदोडिया यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा, श्री. बापूजी शेलार यांनी आमदार श्री. टी. राजासिंह यांचा, सौ. ज्योत्स्ना मुंदडा यांनी सौ. क्षिप्रा जुवेकर यांचा, तर श्री. योगेश गोसावी यांनी श्री. सुनील घनवट यांचा सत्कार केला. तसेच उपस्थित धर्माभिमान्यांचा सत्कार श्री. कपिल शर्मा यांनी केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याच्या टी. राजासिंह यांच्या आवाहनाला सहस्रोंचा प्रतिसाद !

टी. राजासिंह यांनी सांगितले की, तुम्हाला माझ्या हिंदु राष्ट्र कार्याशी जोडायचे असेल, तर मला भ्रमणभाषवर संपर्क करा. व्हॉट्सअ‍ॅप गटात घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य केले जाईल आणि तुम्हीही काय करणार, ते आम्हाला कळवा. यानंतर सहस्रांहून अधिक संख्येने लघुसंदेश तथा दूरभाष त्या क्रमांकावर आले.

”  संपूर्ण भोजन आणि न्याहरी यांची व्यवस्था शीतल हॉटेलचे श्री. लोकेश चौधरी, महात्मा स्वीट्सचे मालक, मयुर हॉटेलचे मालक श्री. मयुर कंड्रे, चेतना डायनिंग हॉलचे श्री. विशाल हरसोत, तसेच सर्वश्री प्रशांत शुक्ल, राजू भावसार, गोविंद साखला यांनी केली.

”  जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व पोलीस प्रशासनाने हिंदु धर्मजागृती सभेला पूर्ण सहकार्य केल्याविषयी हिंदु जनजागृती समितीने त्यांचे आभार मानले आहेत.

धर्मसभेसाठी सहस्त्रो रुपयांचे देवघर घेऊन जाण्यास देणारे धर्मप्रेमी !

सनातन संस्थेचे धुळे येथील साधक श्री. चेतन जगताप यांच्याकडे श्री. युवराज महाजन हे नोकरी करतात. चेतनदादांनी स्वतःचा व्यवसाय धर्मकार्यासाठी पूर्णपणे बंद करून त्यांच्याकडे कामाला असणार्‍या सर्व कामगारांना धर्मसभेच्या सेवेत पूर्णपणे सहभागी होण्यास सुचवले. त्यामुळे श्री. महाजन यांना पंढरपूर येथील श्री. सांगोलकरकाका यांच्यासह बैठकांना जाणे, अर्पणदात्यांकडे जाणे आणि अन्य सेवांसाठी जाण्यास सांगितले होते. धर्मसभेकरिता प्रदर्शनात लावण्यासाठी देवघर घेण्यासाठी एका मोठ्या शोरूममध्ये गेलो होतो. त्या वेळी ओळख नसतांना १४ सहस्र रुपयांचे देवघर कसे देणार, असा विचार मनात आला. त्या वेळी श्री. महाजन म्हणाले की, ओळख नसल्यामुळे ते देवघर देणार नसतील, तर मी माझी नवीन स्कुटी गाडी त्यांच्याकडे ठेवायला सिद्ध आहे.’ त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर माझा भाव द्विगुणीत झाला. आठ दिवस सेवेला जोडलेले श्री. महाजन यांच्यात गुरुदेवांच्या प्रती असलेला भाव लक्षात आला. त्यांच्यातील भावामुळे कोणतीही ओळख नसतांना दुकानाचे मालक म्हणाले, ‘‘जे आवडेल, ते देवघर धर्मसेभेच्या सेवेसाठी घेऊन जाण्यास सांगितले. १४ सहस्र रुपये किमतीचे देवघर एका दिवसासाठी दिले.’’

– श्री. अप्पा सांगोलकर, पंढरपूर

विशेष

सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्य राखीव दलाचे पोलीस, श्‍वान पथक आणि गुप्तचर शाखेतील पोलीस तैनात होते. पोलिसांनी सभेचे सर्व चित्रीकरण केले.

काही मुसलमान युवकही सभेचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. (धूर्त मुसलमान ! – संपादक) त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. (मुसलमानांच्या संदर्भात अशी सतर्कता प्रत्येक वेळीच बाळगायला हवी ! – संपादक)

‘फेसबूक’वरून सभेचे थेट प्रक्षेपण !

धर्मजागृती सभेचे ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. ही सभा २२ सहस्र जणांनी प्रत्यक्ष अनुभवली, तर त्या प्रक्षेपणाची लिंक ९६ सहस्र जणांपर्यंत पोहोचली. सभेची लिंक ७६० हून अधिक जणांनी अन्य जणांना ‘शेअर’ केली. याचसमवेत ५९१ हून अधिक जणांनी सभा पाहून विविध अभिप्राय समितीच्या पानावर व्यक्त केले, तसेच सभेची लिंक ८३७ जणांनी ‘लाईक’ केली.

सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीतून धर्मप्रेमींना दिशादर्शन !

सभेनंतर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला एक सहस्रांहून अधिक संख्येने धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी मान्यवर वक्त्यांशी बोलतांना स्थानिक स्तरावर असलेली अनधिकृत मद्याची दुकाने बंद करणे, रुग्णालयात थुंकण्याच्या जागी लावण्यात आलेल्या देवतांच्या चित्रांच्या टाईल्स हटवणे, वर्तमानपत्रातून होणारे देवतांचे विडंबन आणि अन्य सूत्रांवर चर्चा करण्यात आली. आमदार श्री. टी. राजासिंह आणि श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना दिशा दिली. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. क्षिप्रा जुवेकर यांचीही उपस्थिती होती.

”  पक्ष “

शिवसेना महिला आघाडी, शिवसेना युवा मोर्चा, शिवसेना, भाजप, भाजप युवा मोर्चा, भाजप महिला आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस

”  संघटना “

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रामराज्य ग्रुप सोनगीर, सावता ग्रुप सोनगीर, श्री गणेश मित्र मंडळ देवपूर, शिवबा ग्रुप वाडीभोकर, जय भोले मित्र मंडळ, स्वामी नारायण महिला मंडळ, हिंदू एकता आंदोलन पक्ष, वारकरी संप्रदाय, संताजीनगर महिला मंडळ, वीर शिवाजी मित्र मंडळ, बहिरोबा मित्र मंडळ, आझादनगर मित्र मंडळ, गजानन कॉलनी, डॉ. मिराजनगर मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान, रामनवमी समिती, जय श्रीराम ग्रुप, त्रिवेणी मित्र मंडळ, भोलेबाबानगर मित्र मंडळ, इच्छापूर्ती मारुती मंडळ, सत्यविजय मित्र मंडळ, श्री पिंपळादेवी मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, श्रीरामनगर मित्र मंडळ, विठ्ठल-रुख्माई मित्र मंडळ फागणे, कोंडाजी व्यायाम शाळा, श्रीराम सेना ग्रुप, शिव फाऊंडेशन, क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद मित्र मंडळ, जय खंडेराव मित्र मंडळ, वीर शिवाजी चौक मित्र मंडळ आणि राजे शिव मित्र मंडळ

”  मान्यवर “

खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, भाईजीनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण अग्रवाल, संचालक श्री. कपिल शर्मा, शिवसेना नगरसेवक श्री. संजय गुजराथी, माळेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के, धुळ्याचे माजी स्थायी सभापती श्री. सोनल शिंदे, भाजप नगरसेविका सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री. अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ मोरे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. योगिताताई पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अरविंद जाधव, माजी नगरसेवक श्री. प्रदीप कर्पे, डॉ. विपुलजी बाफणा, डॉ. (सौ.) माधुरी बाफणा, शिवसेनेचे अधिवक्ता सुनील जैन; समाजसेवक श्री. युवराज अण्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचेश्री. गुलशनभैय्या उदासी, शिरपूरचे श्री. रोहितभाऊ शेटे, श्री. महेश मिस्त्री, उद्योगपती श्री. निरंजन भतवाल, माजी नगरसेवक श्री. तुषार प्रतापराव पाटील

काही धर्मप्रेमींनी स्वत:हून धर्मजागृती सभेसाठी सुटी घेतली होती.

पोलिसांनी हिंदूंमध्ये निर्माण केलेली भीती !

यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

सभेनंतर आढावा बैठकीत धर्मप्रेमींना नाव आणि संपर्क लिहिण्यास सांगितल्यावर काही धर्माभिमानी म्हणाले, ‘आम्ही नाव लिहून देऊ शकत नाही. आम्ही येथे आलो, हे पोलिसांना कळले, तर ते आम्हाला उचलून आत टाकतील.’

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कृपावर्षावाची आलेली प्रचीती !

परात्पर गुरु पांडे महाराज

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काढण्यात येणारी वाहनफेरी आणि सभा यांसाठी अनुमती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ करणे, परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यावर आणि मंत्र म्हटल्यावर, तसेच ग्रामदेवता श्री एकवीरादेवीच्या कृपेमुळे पोलिसांनी अनुमती देणे आणि चैतन्यशक्तीची प्रचीती आल्याचे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगणे

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काढण्यात येणार्‍या वाहनफेरीच्या अनुमतीसाठी अर्ज करण्यात आला होता; मात्र अनुमती देण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. २१ डिसेंबर २०१७ या दिवशी धर्मांधांनी मुद्दामहून दगडफेक करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे अनुमती मिळणारच नाही, सभा पुढच्या दिनांकाला घ्या, असे पोलीस खात्याकडून सांगितले जाऊ लागले; पण शहरात बराच प्रसार झाला होता. प्रसिद्धीचे फलक, भित्तीपत्रके लावून झाली होती. हस्तफलके वाटून झाली होती. अशा परिस्थितीत पुढील दिनांकाला सभा घेणे कठीण होते. पोलीस अनुमती नाकारण्यावर ठाम होते. सभा तीन दिवसांवर आली होती. परात्पर गुरु पांडे महाराजांना रात्री ९ वाजता यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी धुळ्याची ग्रामदेवता श्री एकवीरादेवी हिची खण-नारळाने ओटी भरायला सांगितले, तसेच संकटनिवारणार्थ एक मंत्र १००८ वेळा म्हणण्यास दिला होता. तो मंत्र साधकांनी म्हटला.

एक साधक आणि साधिका ओटी भरण्यासाठी श्री एकवीरादेवीच्या मंदिरात गेले. त्या वेळी देवी जणू सांगत आहे की, अनुमती मिळणार आहे, काळजी करू नका, असे जाणवले.  ते दोघे मंदिरातून बाहेर पडले, तितक्यात पोलिसांचा भ्रमणभाष आला की, उद्या पोलीस ठाण्यात येऊन अनुमती घेऊन जा. तेव्हा रात्रीचे १०.३० वाजले होते.

यासंदर्भात परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘चैतन्यशक्तीमुळे अनुमती मिळाली. ग्रामदेवतेला पुढे करून चैतन्यशक्ती कार्य करत असते. ते चैतन्य महत्त्वाचे आहे. ते निर्गुणातून कार्य करते. या चैतन्याला धरून सभेत बोलावे. आक्षेपार्ह बोलणे टाळावे. एखाद्या अयोग्य शब्दाचाही वाईट परिणाम होतो. सूर-असूर दोन्ही ईश्‍वराचीच निर्मिती आहे; पण आपल्याला सूररूपातून कार्य करायचे आहे. मंत्रांच्या माध्यमांतून महर्षी-मुनींनी त्यांची शक्ती दिली आहे. त्यामुळे मंत्रोच्चाराचा सत्कारात्मक परिणाम दिसून येतो.’’

मैदानात काळी बाहुली सापडणे आणि आध्यात्मिक उपायांच्या माध्यमातून परात्पर गुरु पांडे महाराजांनी त्रासाचे निवारण करणे

सभेच्या दिवशी सकाळी मैदानात काळी बाहुली पडलेली दिसली. त्याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांना कळवले; पण ते ध्यानाला बसले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ते ध्यानात बसणार होते; पण हा प्रसंग समजल्यावर त्यांनी ध्यानातून उठून स्वतःच्या आवाजातील मंत्र साधकांना दिला आणि उपाय सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रजप आणि उपाय साधकांनी केले. त्यामुळे सभेत कसलाही अडथळा न येता सभा निर्विघ्नपणे पार पडली.

सभा झाल्यावर परात्पर गुरु पांडे महाराजांचा सभा कशी झाली, हे विचारण्यासाठी भ्रमणभाष आला. त्यांना सर्व सांगितल्यावर पुष्कळ आनंद झाला. मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केले. तेच चैतन्याच्या स्तरावर सर्व करत असतात.’’ परात्पर गुरु पांडे महाराजांनी कर्तेपणा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांकडून शिकण्याची, तसेच चैतन्यशक्तीची अन् मंत्रशक्तीची अनुभूती दिली. त्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !

– (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव

धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्याविषयीची साधकांची प्रार्थना ऐकल्यावर एका महाराजांनी बोलावून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून नंदाभवानी देवीने ‘सभा निर्विघ्नपणे पार पडेल’, असा आशीर्वाद देणे

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वीपणे पार पडावी, यासाठी धुळे गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावरील श्री नंदाभवानी देवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह काही साधक गेले होते. साधकांनी केलेली प्रार्थना ऐकून एका महाराजांनी त्यांना बोलावले आणि मोरपिसाने साधकांवर आध्यात्मिक उपाय केले. महाराज म्हणाले, ‘‘मला देवीने रांगेत उभारलेल्या एवढ्या लोकांतून तुम्हाला (साधकांना) ही सभा यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यास सांगितले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. सभा निर्विघ्नपणे पार पडेल.’’

साधकांची तीव्र तळमळ आणि त्यांचे प्रेरणादायी प्रयत्न यांमुळेच धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी झाली !

हिंदु धर्मजागृती सभेला साधकांच्या तीव्र तळमळीमुळे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात प्रामुख्याने सर्वश्री पंकज बागुल, चेतन जगताप, सचिन वैद्य, भगवान चव्हाण या साधकांचे प्रयत्न सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले !

प्रशासनाकडून अनुमती मिळवण्यात अनेक अडथळे येत होते. सभेला अनुमती मिळू नये, यासाठी धर्मांधांकडूनही अनेक प्रयत्न झाले; परंतु तरीही या साधकांनी तहानभूक विसरून, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा होण्याचा ध्यास घेऊन, तसेच भगवंताला शरण जाऊन अहोरात्र सेवा केली. संपूर्ण सेवेत त्यांनी एकमेकांशी चांगला समन्वय साधला. १ डिसेंबरपासूनच या सर्वांनी सभेच्या प्रसारकार्यात स्वतःला पूर्णवेळ झोकून दिले.

श्री. पंकज बागुल

स्वत: बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी त्यांच्या जनसंपर्कांचा उपयोग सभेच्या संदर्भात अनुमती मिळवणे, व्यासपीठ नियोजन आणि सभेचे आयोजन करणे, विविध संघटनांच्या प्रमुखांना भेटी देणे, त्यांच्याशी समन्वय साधणे या दृष्टीने केला.

श्री. भगवान चव्हाण

श्री. चव्हाण यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही २५ दिवस पूर्णवेळ सेवा केली. त्यांनी धर्माभिमान्यांच्या साहाय्याने १०० हून अधिक बॅनर्स, १ सहस्र भित्तीपत्रके लावली आणि शहराच्या ४० हून अधिक चौकांमध्ये विविध संघटनांचे फलक नियमित लिहून प्रसार केला.

श्री. सचिन वैद्य

श्री. वैद्य यांनी शहरात एकूण ८० प्रसार बैठकांचे आयोजन करून हिंदु धर्मप्रेमींना सातत्याने सभेच्या अनुषंगाने प्रोत्साहित केले. बैठकांनाही सरासरी ७० हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभत होती. यामुळे सभेची वातावरणनिर्मिती चांगली झाली. विशेष म्हणजे सभेच्या दिवसापर्यंत त्यांनी बैठकांचा आढावा घेणे चालूच ठेवले.

श्री. चेतन जगताप

श्री. जगताप यांनी अर्पण, निधीसंकलन, साधकांची निवास व्यवस्था, अल्पाहार, भोजन या सेवांचे दायित्व घेतले.

हिंदु धर्मजागृती सभेच्या सेवेत आणि सभेनंतर धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सभेनंतर दुसर्‍या दिवशी साधक रहात असलेल्या निवासाच्या ठिकाणी येऊन धर्मप्रेमींनी साधकांच्या भेटी घेतल्या. जेवण आणि अल्पाहार यांविषयी त्यांची आत्मीयतेने विचारपूस केली, तसेच साधकांना पाहून ‘जय श्रीराम, नमस्कार दादा, सभा पुष्कळ चांगली झाली’, असे सांगून साधकांना आदर देत होते. प्रत्येक ६ मासांनी धुळे येथे धर्मजागृती सभा व्हावी, अशी धर्मप्रेमींनी साधकांकडे मागणीही केली. श्री. योगेश गोसावी यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या संपर्कातील ७५ हून अधिक कार्यकर्त्यांना बोलावून सभेची सुरक्षा व्यवस्था, सभेचे नियंत्रण करणारे स्वयंसेवक आदी सेवा त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे करवून घेतल्या.

श्री. प्रवीण अग्रवाल यांनी अनेक रिक्शा उद्घोषणा करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे शहरात चार दिवस रिक्शा उद्घोषणेच्या माध्यमांतून मोठा प्रचार झाला.

सर्वत्र हिंदु धर्मजागृती सभेचीच चर्चा चालू असणे

सभेच्या आदल्या दिवशी शहरातील चौकाचौकात जाऊन निमंत्रण देण्यासाठी गेल्यावर कार्यकर्ते ज्या मुलांना भेटायचे, ती मुले सभेचीच चर्चा करत असल्याचे लक्षात यायचे. ‘सभेला कसे जायचे’, याविषयी त्यांची चर्चा चालू असायची. व्यायामशाळेतील मुलांना निमंत्रण देण्यासाठी गेल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही सभेला येणारच आहोत.’’

तेव्हा वाटत होते की, देवाने सर्वत्र हा विषय पोहोचवलाच आहे. सर्व मुलांना ही सभा आपलीच वाटत होती. तेच सभेचा प्रसार करत होते. अगदी प्रत्येक गल्लीत चौकात सभेचीच चर्चा चालू होती.

गोमाता आणि वासरू यांचे दर्शन म्हणजे शुभसंकेत !

सभेच्या काळात सेवा करणार्‍या साधकांना शहरात बर्‍याच ठिकाणी भर रस्त्यात वासरू गोमातेचे दूध पित असल्याचे दिसायचे. असे सहसा दिसत नाही. तो एक शुभसंकेत असल्याचेच सर्वांना वाटले.

गिंदोडिया मैदानाच्या मालकांनी सभेमुळे मैदान पावन झाल्याचे सांगणे आणि पुढील सभांसाठीही मैदान वापरण्याची अनुमती देणे

हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार म्हणजे ईश्‍वराचे अधिष्ठान असलेले दैवी कार्य असल्याची मिळालेली पोचपावती !

हिंदु धर्मजागृती सभेला मिळालेले मैदान श्री. जुगलकिशोर गिंदोडिया यांनी विनामूल्य दिले होते. सभेनंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांची भेट घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘ही सभा होणे आवश्यक होते. प्रत्येक वक्त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. सभेने सर्वांना आनंद दिला. या मैदानात सभा झाली, एवढ्या संख्येने लोक आले, धर्माचा विषय झाला. यामुळे हे मैदान पावन झाले. यापुढील सभेसाठीही हेच मैदान तुम्ही घेऊ शकता. माझ्या मैदानात संतांचा असा पवित्र कार्यक्रम झाल्याविषयी मी कृतज्ञ आहे. आतापर्यंत या मैदानात अनेक राष्ट्रीय कार्यक्रम झाले; मात्र त्या सर्वांमध्ये मला सर्व दृष्टीने हिंदु धर्मजागृती सभा आदर्श वाटली. तसेच सभेला २२ सहस्र हिंदूंची उपस्थिती पाहून मला कौतुक वाटले. ईश्‍वरानेच मला ही सेवेची संधी दिली.’’

सन्माननीय वक्त्यांचे आगमन !

जयजयकाराने ज्यांच्या धडकी भरे शत्रूंना ।

हिंदवी स्वराज्याचा दाता जो झाला ॥ १ ॥

करूनी वंदन तत् श्रीमत् शिवप्रभूंना ।

पुनश्‍च आरंभ करूया सुराज्यनिर्मितीला ॥ २ ॥

सभेची क्षणचित्रे थोडक्यात…

  • अग्रवाल समाजाच्या श्री अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याला आमदार टी. राजासिंह यांनी पुष्पहार अर्पण करून सभास्थळी प्रस्थान केले.
  • सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने मैदानावरील जागाही अपुरी पडली.  त्यामुळे शेकडो धर्मप्रेमी रस्त्यावर उभे राहून सभा ऐकत होते.
  • गटागटाने येणारे युवक घोषणा देत आणि भगवे झेंडे फडकवत येत होते.
  • आमदार श्री. टी. राजासिंह यांनी उत्स्फूर्तपणे १ घंटा मार्गदर्शन केले. लोक शेवटपर्यंत त्यांचे मार्गदर्शन ऐकत होते.
  • थंडीतही लहान मुले, महिला, पुरुष शेवटपर्यंत सभा ऐकण्यासाठी थांबले.

धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया….

हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अप्रतिम ! या प्रचाराच्या पद्धतीला तोड नाही. सभेला चांगली उपस्थिती असणार, यात शंकाच नाही !

– श्री. रवी बेलपाठक, प्रसिद्ध वास्तुविशारद, धुळे

आम्ही आमच्या गावातही हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करतो. सर्व खर्च करतो. तुम्ही केवळ वक्ते म्हणून या !

– श्री. शरद पाटील, माजी आमदार, शिवसेना आणि श्री. परशुराम देवरे, पंचायत समिती सदस्य, बोरीस

आम्हाला तुमच्या संघटनेत सहभागी करून घ्या. आमच्या गावात तुमची शाखा स्थापन करा. मी माझ्या कीर्तनातून लव्ह जिहाद आणि गोहत्या यांविषयी प्रबोधन करतो. तुम्ही माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून धर्मरक्षणाचे कार्य करवून घ्या.

– हिंदु धर्मसेवक तथा कीर्तनकार ह.भ.प. युवराज महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या या धर्मजागृती सभेने यापूर्वी झालेल्या सर्व सभांचे विक्रम मोडित काढले आहेत ! – एक धर्मप्रेमी

धर्मकार्यात उल्लेखनीय योगदान देणारे हिंदुत्वनिष्ठ, हे हिंदु राष्ट्राचे शिलेदारच !

मंत्र्यांपेक्षा धर्मकार्य करणारे समितीचे कार्यकर्ते महत्त्वाचे असल्याचे सांगणारे एक संपादक !

एका वृत्तवाहिनीचे संपादक सभेनंतर मंत्र्यांच्या कार्यक्रमाची बातमी घेण्यासाठी एके ठिकाणी आले होते. तेथे काही मंत्रीही आले. समितीच्या कार्यकर्त्यांना पाहून संपादक म्हणाले, ‘‘या मंत्र्यांपेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहात; कारण तुम्ही धर्मकार्य करत आहात. आम्ही सभेतील सर्व वक्त्यांची भाषणे ३ घंटे ऐकली. तुमचे वक्ते कुठे चुकतात का, हे आम्ही बघत होतो; मात्र या भाषणात एकही वक्ता बोलतांना चुकला नाही. आम्हाला एकही चूक आढळली नाही.’’

सभेच्या सेवेत सहभागी होण्यास उत्सुक असणारे उद्योजक !

सभेनंतर एका उद्योजकांना संपर्क करण्यास कार्यकर्ते गेले होते. उद्योजक म्हणाले, ‘‘तुम्ही ईश्‍वरी कार्य करत आहात. तुम्ही तुमचा वेळ का घालवता ? काही साहाय्य हवे असल्यास अथवा काही सेवा असल्यास मला संपर्क करून सांगा.’’

कर्मचार्‍यांना सभेला उपस्थित रहाण्यासाठी आस्थापनांमध्ये जाऊन आवाहन करणारे श्री. बापूजी शेलार !

श्री. बापूजी शेलार यांनी सभेच्या दिवशी सकाळी MIDC भागात जाऊन ७-८ आस्थापनांमध्ये आवाहन केले की, आज सभा असल्याने सर्व कर्मचार्‍यांना सायंकाळी सभेसाठी लवकर सोडा. शहरातील अनेक व्यापार्‍यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना सभेला जाण्यासाठी दुपारी ४ वाजताच सुट्टी दिली.

केवळ भ्रमणभाष केल्यासही विज्ञापन पाठवू शकत असल्याचे प्रतिष्ठित उद्योजकाने सांगणे

सभेच्या विशेषांकासाठी विज्ञापन देतांना एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणाले, ‘‘तुम्ही विज्ञापन घेण्यासाठी माझ्याकडे येऊन तुमचा बहुमूल्य वेळ घालवू नका. तुम्ही भ्रमणभाष केल्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला विज्ञापन पाठवून दिले असते.’’

धर्मजागृती सभेच्या दिवशी सुट्टी मिळत नसल्याने नोकरीचा राजीनामा देण्यास सिद्ध असणारे श्री. हरीश जगताप !

श्री. हरीश जगताप हे सभेच्या वेळी झालेल्या निमंत्रण बैठकीतून सक्रिय झाले. ते सेवेलाही वेळ देऊ लागले. त्यांनी वाहन फेरी आणि धर्मजागृती सभा या दिवशी मालकाकडे सुट्टी मागितली; पण सभेच्या दिवशी सुट्टी देण्यास त्यांचा मालक टाळत होता. त्या वेळी हरीश यांनी राजीनामा देण्याची सिद्धता दर्शवली. काही दिवसच सेवेत सक्रिय झालेल्या हरीश यांची सभेसाठी म्हणजेच धर्मासाठी काम सोडण्याची सिद्धता खरोखर प्रेरणादायी आहे.

अभिप्रायांची सर्वाधिक नोंद

३ सहस्त्र ५६४ अभिप्राय धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर धर्मप्रेमींकडून मिळाले आहेत. आतापर्यंत अन्य कोणत्याही सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लिखित अभिप्राय मिळाले नव्हते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा सत्कार !

सभेला उपस्थित असणारे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (१) यांचा सत्कार समितीचे धुळे समन्वयक श्री. पंकज बागुल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी व्यासपिठावर जाऊन आमदार श्री. टी. राजासिंह यांचा सत्कार केला.

भ्रमणभाषमधील फ्लॅशलाईटच्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणाला अनुमोदन !

‘अयोध्येत श्रीराम मंदिरांचे निर्माण व्हावे, असे किती जणांना वाटते, त्यांनी आपल्या भ्रमणभाषची फ्लॅशलाईट (विजेरी) चालू करून दाखवावी’, असे आवाहन टी. राजासिंह यांनी केले असता संपूर्ण मैदानात लखलखणार्‍या पांढर्‍या चांदण्यांप्रमाणे प्रकाश पसरला होता. सभेमध्ये नवा उत्साह निर्माण झाला.

आढावा बैठकीला उपस्थित धर्माभिमानी

सभेनंतर २९ डिसेंबरला घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला १५० धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी ४७ जणांनी धर्मकार्यासाठी प्रतिदिन १ घंटा देणार असल्याचे सांगितले. यासह धर्मशिक्षणवर्गासाठी १८ जणांनी, स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गासाठी २ जणांनी, तर प्रथमोपचार उपक्रमासाठी ८ जणांनी नाव नोंदणी केली. ६ ठिकाणी धर्मजागृती सभा घेण्याची मागणी करण्यात आली. १२ जणांनी नियतकालिक वर्गणीदार होण्याची सिद्धता दर्शवली.

द्वारकाधिश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बापूजी शेलार यांच्या वतीने सभास्थळी उभारण्यात आलेली गाय आणि वासरू यांची प्रतिकृती


Multi Language |Offline reading | PDF