आखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी सूची प्रसिद्ध करणार

आज प्रयाग येथे साधू-संतांची तातडीची बैठक

लखनौ – साधू-संतांची शिखर संस्था असलेल्या ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने काही मासांपूर्वी भोंदू बाबांची पहिली सूची प्रसिद्ध केल्यानंतर आता परिषदेकडून लवकरच दुसरी सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आखाडा परिषदेने २९ डिसेंबरला प्रयाग येथे तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत ही सूची घोषित  करण्याची शक्यता आहे. यापूर्वी भोंदू बाबांची सूची प्रसिद्ध करणारे महंत मोहनदास महाराज अद्यापही बेपत्ता आहेत.


Multi Language |Offline reading | PDF